पुरवठ्यात कपात करून नागपूर मनपाची पाणीबचत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:15 AM2019-05-13T11:15:26+5:302019-05-13T11:16:56+5:30

कन्हान नदी व तोतलाडोहातील पाणी पातळी खालावल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे महापालिकेकडे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Nagpur municipal water saving by reducing supply! | पुरवठ्यात कपात करून नागपूर मनपाची पाणीबचत!

पुरवठ्यात कपात करून नागपूर मनपाची पाणीबचत!

Next
ठळक मुद्देदरवर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत कमी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्हान नदी व तोतलाडोहातील पाणी पातळी खालावल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे महापालिकेकडे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्याची बचत करण्याचा संदेश देण्यासोबतच महापालिकेचा जलप्रदाय विभाग पाण्याची बचत करीत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शहराला दररोज ७४० एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा जातो. परंतु तूर्त ६९० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अधिकृतपणे यासंदर्भात माहिती देण्याचे टाळले जात आहे
दरम्यान, ज्या भागात २४ बाय ७ पाणीपुरवठा होत होता अशा भागातही पाणीपुरवठा कमी केल्याची माहिती आहे, तर काही भागातील पाणीपुरवठ्यात कपात करण्यासाठी दबाव वाढल्याची माहिती आहे. शहरलगतच्या भागातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून एक तास करण्यात आली आहे. दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक ांना पुरेसे पाणी मिळत नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.
सोमवारी १३ मे रोजी महापौर नंदा जिचकार, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके व आयुक्त अभिजित बांगर, पाणीपुरवठयाची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यूचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
टिल्लू पंपांचा सर्रास वापर
शहरातील पाणीतूट ५० टक्क्यापर्यंत आहे. यात सुधारणा झाली असती तर शहरातील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी झाले असते. मानकाच्या तुलनेत शहरात दराडोई अधिक पाणीपुरवठा होत आहे. अवैध टिल्लू पंपांचा सर्रास वापर सुरू आहे. शुक्रवारी लकडगंज, आसीनगर झोन क्षेत्रात प्रत्येकी तीन टिल्लू पंप जप्त केले, तर नेहरूनगर व सतरंजीपुरा झोन भागात चार बूस्टर पंप जप्त करण्यात आले.

Web Title: Nagpur municipal water saving by reducing supply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.