नागपूर मनपा : आपली बसच्या भाडेवाढीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:49 PM2018-05-31T22:49:03+5:302018-05-31T22:49:33+5:30

शहर बससेवा लोकांच्या सुविधेसाठी चालविली जाते. यात नफा कमावण्याचा हेतू नसतो. याच धर्तीवर नागपूर शहरातील शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. राज्यातील सर्वच शहरातील बससेवा तोट्यात आहे. शहर बसच्या भाड्यात वाढ केल्यास आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर याचा बोजा पडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रवासी भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Nagpur Municipal Corporation: Resistance to Apali bus fare | नागपूर मनपा : आपली बसच्या भाडेवाढीस विरोध

नागपूर मनपा : आपली बसच्या भाडेवाढीस विरोध

Next
ठळक मुद्देविरोधक आक्रमक : महागाईत आर्थिक बोजा नको

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर बससेवा लोकांच्या सुविधेसाठी चालविली जाते. यात नफा कमावण्याचा हेतू नसतो. याच धर्तीवर नागपूर शहरातील शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. राज्यातील सर्वच शहरातील बससेवा तोट्यात आहे. शहर बसच्या भाड्यात वाढ केल्यास आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर याचा बोजा पडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रवासी भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या सभागृहातही या प्रस्तावाला विरोध करण्याची तयारी विरोधकांनी चालविली आहे.
रेडबसमध्ये दोन किलोमीटरला आकारण्यात येणार ८ रुपये भाडे १० रुपये करण्याचा प्रस्तावित आहे. म्हणजेच १० किलोमीटर अंतराला १० रुपये जादा मोजावे लागणार आहे. शहर बसमधून प्रामुख्याने गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक प्रवास करतात. त्यामुळे भाडेवाढीचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.
भाडेवाढ न करण्याचे महापौरांना पत्र
महापालिकेच्या परिवहन विभागाने २५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे. शहर बसभाड्यात वाढ केल्यास याचा फटका गोरगरीब लोकांना बसणार आहे. आधीच पेट्रोल -डिझेलच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात बसभाड्यात वाढ केल्यास सामान्यांवर दुहेरी बोजा पडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित भाडेवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा. यासाठी महापौरांना गुरुवारी पत्र दिले आहे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

तोट्याला विभागच जबाबदार
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हा विभाग तोट्यात आहे. आॅपरेटरसोबत करण्यात आलेल्या करारातही त्रुटी आहेत. भाजपा नेत्यांनी निवडणुकीत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आॅपरेटर बदलला तरी सेवेत कोणताही बदल झालेला नाही. उलट वर्दळीच्या भागातही बसेस भरधाव वेगाने धावतात. यामुळे अपघाताचा धोका आहे. याकडे लक्ष न देता भाडेवाढ करून लोकांना वेठीस धरणे योग्य नाही.
दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी

बसचा तोटा भाडेवाढीतून निघणार नाही
महापालिकेची शहर बससेवा तोट्यात चालण्याला अनेक कारणे आहेत. विभागातील भ्रष्टाचाराही याला कारणीभूत आहे. अनावश्याक खर्चाला आळा घालण्याची गरज आहे. यावर उपाययोजना न करता बसभाड्यात वाढ करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याला आमचा विरोध आहे. सभागृहात हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला तर बसपाचे नगरसेवक याला विरोध करतील.
मोहम्मद जमाल, गटनेते, बसपा

शहर बसभाडेवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे .परंतु याप्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना पाससाठी जादा पैसे मोजावे लागतील. भाडेवाढ न करता अनावश्यक खर्चाला आळा घातला तरी मोठ्याप्रमाणात आर्थिक बचत शक्य आहे. याकडे लक्ष न देता भाडेवाढ करण्याला आमचा विरोध आहे.
मनोज सांगोळे, नगरसेवक

सामान्यांना वेठीस धरू नये
पेट्रोल -डिझेलच्या किमती वाढल्याने शहर बस भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव आणण्याचा परिवहन समितीचा विचार आहे. परंतु पेट्रोल दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यात भाडेवाढीचा बोजा टाकणे योग्य नाही. शहर बसभाड्यात वाढ केल्यास याचा फटका गरीब वर्गालाच बसणार असल्याने भाडेवाढ करून महापालिकेने सर्वसामान्यांना वेठीस धरू नये.
संजय महाकाळकर, नगरसेवक

ग्रीनबस भाडे टप्प्यामागे दोन रुपयांनी कमी करावे

ग्रीनबसला प्रवाशांचा प्रतिसाद नाही. प्रवाशांनी या बसमधून प्रवास करावा यासाठी प्रत्येक टप्प्यामागे २ रुपये भाडे कपात करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाला दिला होता. त्यानुसार निर्णय घेतला असता तर १० किलोमीटर प्रवास करणाऱ्यांना १० रुपयांची सूट मिळाली असती. मात्र प्रशासनाने फक्त २ रुपये भाडेकपात केली आहे. यामुळे भाडेकपात केल्यानतंरही या बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
प्रवीण भिसीकर, नगरसेवक

 

Web Title: Nagpur Municipal Corporation: Resistance to Apali bus fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.