नागपूर एमआयडीसी भागात ट्रेलरने कचरा वेचणाऱ्याला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:37 PM2017-11-17T14:37:43+5:302017-11-17T14:39:14+5:30

हलगर्जीपणे ट्रेलर चालवून त्याच्या चालकाने एका कचरा वेचणाऱ्याला चिरडले. गुरु वारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बार जवळ हा भीषण अपघात घडला.

In Nagpur MIDC area trailer crushed the garbage holder | नागपूर एमआयडीसी भागात ट्रेलरने कचरा वेचणाऱ्याला चिरडले

नागपूर एमआयडीसी भागात ट्रेलरने कचरा वेचणाऱ्याला चिरडले

Next
ठळक मुद्देकचरा वेचणाऱ्याची ओळख पटलेली नाहीट्रेलर चालकाला अटक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : हलगर्जीपणे ट्रेलर चालवून त्याच्या चालकाने एका कचरा वेचणाऱ्याला चिरडले. गुरु वारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बार जवळ हा भीषण अपघात घडला.
एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक अनोळखी इसम रंगोली बार जवळ गुरु वारी रात्री उभा होता. आरोपी ट्रेलर (एमएच ३६/ १७५५) चा चालक अनिल राम गरिबाकुमार (वय २१, रा. मौआईमा, पुरी, अलाहाबाद) याने हलगर्जीपणे ट्रेलर वळवून त्या व्यक्तीला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरातील वातावरण काही वेळेसाठी संतप्त झाले. महेश फुलचंद जयस्वाल (वय ५०) यांनी दिलेल्या तक्र ारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अनिलला अटक केली.

Web Title: In Nagpur MIDC area trailer crushed the garbage holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात