नागपूर लोकसभा : निवडणुकीसाठी लागणार २३४ शहर बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:16 PM2019-03-18T23:16:55+5:302019-03-18T23:17:46+5:30

नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने महापालिकेच्या परिवहन विभागाकडे २३४ बसेसची मागणी केली आहे. १० व ११ एप्रिलला या बसेस उपलब्ध करावयाच्या आहेत.

Nagpur Lok Sabha: 234 city buses will be required for elections | नागपूर लोकसभा : निवडणुकीसाठी लागणार २३४ शहर बसेस

नागपूर लोकसभा : निवडणुकीसाठी लागणार २३४ शहर बसेस

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाकडे निवडणूक विभागाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने महापालिकेच्या परिवहन विभागाकडे २३४ बसेसची मागणी केली आहे. १० व ११ एप्रिलला या बसेस उपलब्ध करावयाच्या आहेत.
महापालिके च्या परिवहन विभागाच्या ३२२ बसेस शहरात धावतात. यातील २३४ बसेस निवडणुकीसाठी उपलब्ध करावयाच्या आहेत. अशा आशयाचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाकडून परिवहन विभागाला प्राप्त झाल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.
नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात २०३७ मतदान केंदे्र आहेत. या केंद्रांवर ईव्हीएम पोहचविणे व आणणे, कर्मचारी व अधिकाऱ्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था यासाठी या बसेसची गरज भासणार आहे. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या विचारात घेता बसेस उपलब्ध करण्यात येतील. विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रांची संख्या अशी, दक्षिण-पश्चिम नागपूर ३६२, दक्षिण नागपूर ३४४, पूर्व नागपूर ३३४, मध्य नागपूर ३०५, पश्चिम नागपूर ३३१ व उत्तर नागपूरमध्ये ३५१ मतदान केंद्रे आहेत.
निवडणुकीसाठी बसेस दिल्याने १० व ११ एप्रिलला शहरात ८८ बसेस धावतील. यामुळे दोन दिवस प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागणार आहे. ११ एप्रिलला मतदानाची सुटी असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी राहील. परंतु १० एप्रिलला नेहमीप्रमाणे वर्दळ राहणार आहे.

 

Web Title: Nagpur Lok Sabha: 234 city buses will be required for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.