नागपुरात  क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 08:54 PM2018-05-12T20:54:32+5:302018-05-12T20:54:49+5:30

लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या बुकीला नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सतीश तुकाराम बोबलवार (वय ३३) असे या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोबाईलसह १७,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

In the Nagpur cricket betting raided | नागपुरात  क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड

नागपुरात  क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड

Next
ठळक मुद्देएक बुकी गजाआड : नंदनवन पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करणाऱ्या बुकीला नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. सतीश तुकाराम बोबलवार (वय ३३) असे या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ मोबाईलसह १७,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
नंदनवनमधील चामट चक्की चौकात लाली लॉटरी सेंटरमध्ये बसून आरोपी बोबलवार क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत होता. शुक्रवारी रात्री आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग विरूद्ध राजस्थान रॉयल संघात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर तो सट्टा घेत होता. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार माणिक नलावडे यांच्या नेतृत्वात नायक शिपाई राजेश बिजवे, अभय मारोडे, रोशम निंबर्ते, अतुल चिट्टलवार यांनी तेथे छापा घालून बोबलवारला अटक केली.

Web Title: In the Nagpur cricket betting raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.