नागपूर शहर बस तिकीट घोटाळा : ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 08:07 PM2018-03-09T20:07:04+5:302018-03-09T20:07:37+5:30

तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून शहर बस परिवहन विभागात साडेबारा लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या ३५ आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur City Bus Ticket Scam: FIRs filed against 35 accused | नागपूर शहर बस तिकीट घोटाळा : ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर शहर बस तिकीट घोटाळा : ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे१२.५५ लाखांचा घोटाळा : इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून शहर बस परिवहन विभागात साडेबारा लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या ३५ आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद इरशाद मोहम्मद जावेद (रा. नेर, जि. यवतमाळ), संदीप राऊत, वैभव तितरमारे (रा. श्री हरी रोड, शांतिनगर), सचिन गणवीर (रा. आमघाट, पिपळा), स्वप्निल मून (रा. भीमनगर, हिंगणघाट, जि. वर्धा), हर्षल निंबाळकर, पंकज मेंढे (रा. उप्पलवाडी), विशाल राऊत, धीरज गजघाटे (दोघेही रा. चंद्रमणीनगर), सचिन शेंभेकर (रा. वडधामना), राजेश सरोदे (रा. पिपळा फाटा), राजेंद्र बोडखे (रा. वाठोणा, ता. नरखेड), अमोल श्रीखंडे (रा. देवबर्डी, मोहपा), प्रवीण काळबांडे (रा. मन्नारखेडी, सावरगांव), विलास सोनकुसरे (रा. विनोदनगर), यशवंत खोब्रागडे (रा. यशोधरानगर), रितेश छिवरे (रा. इतवारी), दीपक सोमकुंवर, अरविंद गोलाईत (दोघेही रा. महेंद्रनगर, बिनाकी), मंगेश शेंडे (रा. शिवनगर, चनकापूर), विजयकुमार कनोजिया (रा. भाजीमंडी, शितला माता मंदिर जवळ, कामठी), भूपेश वाघमारे (रा. अयोध्यानगर), संतोष यादव (रा. सिल्लेवाडा), आशिष बहादे (रा. चंद्रमणीनगर), विजय त्रिवेदी (रा. नवीन शुक्रवारी), अजय मगनलाल गुप्ता (रा. झिंगाबाई टाकळी), कमलेश पाटील (रा. जुनी शुक्रवारी), उमेश कुटे (रा. ईसासनी), धर्मेंद्र काळे (रा. जुनी कामठी), अनिल डहाके (रा. दहेगाव रंगारी), संदीप पाटील (रा. गोरेवाडा), कमलाकर कोडावते (रा. फुकटनगर), सागर बिबे (रा. योगी अरविंदनगर), सूरज बागडे (रा. सरस्वतीनगर, इंदोरा) आणि महेंद्र भाजीखाये (रा. सावंगा) अशी आरोपींची नावे आहेत.
अटक कुणालाच नाही
सर्व आरोपी आपली (स्टार) बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. १ जुलै २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून अफरातफरीचा कट रचला. त्यानुसार तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून १२ लाख ५४ हजार ९६५ रु.चा अपहार केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर रवींद्र राम पागे (वय ६२, रा. गणपती अपार्टमेंट, महाल) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्रीपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Nagpur City Bus Ticket Scam: FIRs filed against 35 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.