नागपुरात  आठवलेंची रिपाइं भाजपवर नाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:55 PM2018-02-10T19:55:47+5:302018-02-10T20:05:51+5:30

गेल्या निवडणुकीमध्ये रिपाइं(आ)ने भाजपाशी युती केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले. परंतु कार्यकर्त्यांना मात्र काहीही मिळाले नाही. गेल्या चार वर्षांत सामान्य कार्यकर्त्यांना या युतीचा कवडीचा फायदा झाला नसल्याची टीका करीत भाजपावर नाराजी व्यक्त केली आहे.

In Nagpur Athawale's RPI rage revolves around the BJP | नागपुरात  आठवलेंची रिपाइं भाजपवर नाराज 

नागपुरात  आठवलेंची रिपाइं भाजपवर नाराज 

googlenewsNext
ठळक मुद्देयुतीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी : शहर कार्यकारिणीचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या निवडणुकीमध्ये रिपाइं(आ)ने भाजपाशी युती केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले. परंतु कार्यकर्त्यांना मात्र काहीही मिळाले नाही. गेल्या चार वर्षांत सामान्य कार्यकर्त्यांना या युतीचा कवडीचा फायदा झाला नसल्याची टीका करीत भाजपावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर युतीबाबत पुनर्विचार करावा, असा ठरावदेखील शहर कार्यकारिणीने पारित केला असून, त्याबाबत पक्ष नेतृत्वाला कळविले आहे.
रिपाइं(आ.)चे शहर अध्यक्ष बाळू घरडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची बैठक रविभवन येथे पार पडली. बैठकीत कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराची घटना आणि त्यातील आरोपींवर होत नसलेल्या कारवाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपा-रिपाइं(आ.) युतीला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण होत आहेत. या युतीचा दलित, शोषित,वंचित, पीडित आदिवासी, अल्पसंख्यक आणि शेतकरीवर्गाला कवडीचाही फायदा झालेला नाही, अशी जाहीर नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज वाटण्यासाठी निधीच उपलब्ध नाही. परिणामी होतकरू युवकांना आर्थिक आधार मिळत नसल्याने बेरोजगारीची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
युती होत असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या युतीबाबत पुनर्विचार व्हावा, अशी विनंती पक्ष नेतृत्वाला करण्यात आली आहे.
बैठकीत पुरुषोत्तम गायकवाड, भीमराव मेश्राम, बंटी अलेक्झांडर, सिद्धार्थ कांबळे, अ‍ॅड. भीमराव कांबळे, डॉ. मनोज मेश्राम, निशिकांत हुमणे, हरीश जानोरकर, प्रभाकर गेडाम, सुमित कुरिल, रवी सूर्यवंशी, संदेश खोब्रागडे, धर्मपाल गजभिये, वीरेंद्र मेश्राम, सुमित एकवारे, साजर मेश्राम, रामेश्वर काळबांडे, राजकृष्ण गजभिये, राजू घोंगाडे, डॅसमंड जॉन, जितेंद्र पुंजे आदी उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पंतप्रधानांना निवेदन
येत्या १२ मार्च रोजी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलन होणार आहे. त्यासाठी शहरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. १३ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येईल. त्यासाठी शहरात स्वतंत्र विदर्भ राज्य जनजागरण अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: In Nagpur Athawale's RPI rage revolves around the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.