नागपुरात सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांचे ‘स्कॅन’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:06 AM2018-11-22T00:06:57+5:302018-11-22T00:09:12+5:30

शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

In Nagpur 4252 criminals 'scan' in Six days | नागपुरात सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांचे ‘स्कॅन’ 

नागपुरात सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांचे ‘स्कॅन’ 

googlenewsNext
ठळक मुद्देआॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ : गुन्हेगारांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज  नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांनी आॅपरेशन ‘क्रॅक डाऊन’ अंतर्गत सहा दिवसात ४२५२ गुन्हेगारांची चौकशी, तपासणी अर्थात ‘स्कॅन’ केले आहे. पोलिसांनी ३२८ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शहर पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी १५ नोव्हेंबरला ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन पार्ट-२’ला प्रारंभ केला. आयुक्तांच्या नेतृत्त्वात २० आॅगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन पार्ट-१’ मोहीम राबविण्यात आली होती. गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई, अवैध प्रकारे हत्याराचा उपयोग करणाऱ्यांना जेरबंद करणे, मारपीट अथवा लूटमारीच्या गुन्ह्यात लिप्त आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई, मादक पदार्थांच्या विक्रीत लिप्त आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. याशिवाय अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. मोहिमेदरम्यान पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
‘आॅपरेशन क्रॅक डाऊन पार्ट-२’ अंतर्गत शहर पोलिसांनी सहा दिवसात गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. शहराच्या प्रत्येक ठाण्याच्या परिसरात सक्रिय गुन्हेगारांची ‘कुंडली’ पोलिसांनी तपासली आहे. तब्बल ४२५२ गुन्हेगारांची चौकशी केली आहे. गुन्हेगारीत सक्रिय असलेल्यांना शांत राहण्याचा इशारा दिला आहे. ३३८ गुन्हेगारांवर विभिन्न कलमांतर्गत कारवाई केली आहे. मादक पदार्थांच्या विक्री प्रकरणांत दोन गुन्हे नोंदविले आहेत. या दरम्यान फरार आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारीत सक्रिय असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही मोहीम पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यामध्ये गुन्हे शाखा आणि शहरातील सर्व ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.

गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार
गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासह नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ मोहीम सुरू केली आहे. अवैध व्यवसायामुळे गुन्ह्याचा आलेख वाढतो. शहरात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारांना जागा नाहीच. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास संपादन करण्याचा मोहिमेचा उद्देश आहे. अशी मोहीम भविष्यातही राबविण्यात येणार आहे.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त,
नागपूर शहर.

Web Title: In Nagpur 4252 criminals 'scan' in Six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.