नागपूरनजीक बुटीबोरीत युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:48 PM2019-02-25T23:48:38+5:302019-02-25T23:51:45+5:30

क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या झाल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवन बाबूलाल चौधरी (२४) रा.सुकळी (बेलदार),असे मृत युवकाचे नाव आहे.

The murder of youth in Butibori near Nagpur | नागपूरनजीक बुटीबोरीत युवकाची हत्या

नागपूरनजीक बुटीबोरीत युवकाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून झाला वादलोखंडी रॉडने केला प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (बुटीबोरी) : क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या झाल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवन बाबूलाल चौधरी (२४) रा.सुकळी (बेलदार),असे मृत युवकाचे नाव आहे.
पवन हा एमआयडीसी परिसरातील गॅलक्सी वाईन शॉप येथे दारू पिण्यासाठी गेला होता. तिथून दारू विकत घेऊन तो वाईन शॉपच्या मागे जाऊन दारू पित असता आरोपी अर्पित बागडे, निकेश वैरागे,टिकेश शाहू व एक अन्य चारही तिथेच दारू पित असता त्यांचे मृत पवन याच्याशी काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला.वाद विकोपाला गेला असता आरोपींनी पवनच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला व तिथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी पवनला तत्काळ बुटीबोरी येथील माया हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीदरम्यान मृत घोषित केले. पोलिसांनी लागलीच आरोपींचा शोध घेऊन अटक केली. घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे मृताच्या नातलगांच्या गर्दीमुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

Web Title: The murder of youth in Butibori near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.