जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनेत मेडिकल ठरतेय ‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:29 PM2018-04-07T15:29:18+5:302018-04-07T20:55:03+5:30

जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाने मानव व पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, याला घेऊन ‘लोकमत’ने मेडिकलमधील जैविक कचऱ्याचा व्यवस्थापनेला घेऊन वृत्त प्रसिद्ध केले होते. आ. नागो गाणार यांनी या विषयाला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. याची दखल वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली, रविवार ८ एप्रिल रोजी ते मेडिकल सोबतच मेयो येथील जैविक कचरा व्यवस्थपनेचा आढावा घेणार आहे.

Medical become model of biological waste management 'model' | जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनेत मेडिकल ठरतेय ‘मॉडेल’

जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनेत मेडिकल ठरतेय ‘मॉडेल’

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाने मानव व पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, याला घेऊन ‘लोकमत’ने मेडिकलमधील जैविक कचऱ्याचा व्यवस्थापनेला घेऊन वृत्त प्रसिद्ध केले होते. आ. नागो गाणार यांनी या विषयाला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. याची दखल वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली, रविवार ८ एप्रिल रोजी ते मेडिकल सोबतच मेयो येथील जैविक कचरा व्यवस्थपनेचा आढावा घेणार आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये आता जैविक कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होत असल्याने शासकीय रुग्णालयांसाठी एक ‘मॉडेल’ म्हणून ते समोर आले आहे.
वेगवेगळ्या आॅपरेशननंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज, रुग्णाशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू जैविक कचऱ्यामध्ये (बायो-मेडिकल वेस्ट) मोडते. जैविक कचरा हाताळणीचे कठोर नियम आहेत. त्यानुसार रुग्णालयांमधून निघणारा हा जैविक कचरा तीन प्रकारात विभागला जाणे आवश्यक आहे. यात रक्त, मानवी अवयव हा कचरा लाल रंगाच्या पिशवीत, कापूस, सिरिंज, गोळ्या-औषधी पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तर रुग्णांच्या जेवणातून, नाश्तामधून उरलेल्या वस्तू हिरव्या रंगाच्या कॅरिबॅगमधून टाकायला हव्यात. या कॅरिबॅग भरल्यानंतर त्यापासून इन्फेक्शन होणार नाही, अशा ठिकाणी तो कचरा ठेवून विघटन करण्याची जबाबदारी दिलेल्या संस्थेकडे हा कचरा सुपूर्द करण्याचा नियम आहे. मात्र, मेडिकल प्रशासन या कचºयाच्या व्यवस्थापनेला घेऊन फारसे गंभीर नव्हते. जैविक कचरा सामान्य कचरामध्ये मिसळत होता. धक्कादायक म्हणजे, वॉर्डावॉर्डातून गोळा झालेला कचरा ‘वॉर्ड क्र. ४९’च्या समोर उघड्यावर टाकला जात होता. मोकाट जनावरांकडून हा कचरा इतरत्र पसरविला जायचा. याला घेऊन ‘लोकमत’ने ‘संसर्ग वाढणार की थांबणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल आ.गाणार यांनी घेऊन तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. स्वत: याची पाहणी करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार रविवारी ते मेडिकल सोबतच मेयो रुग्णालयातील जैविक कचऱ्याचा आढावा घेणार आहे. मात्र दरम्यानच्या काळात मेडिकलने जैविक कचऱ्याची सुक्ष्मस्तरावर व्यवस्थापन केल्याने याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 वॉर्डाबाहेर रोज होते जैविक कचऱ्याची तपासणी
मेडिकलमधील बा'रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, विविध वॉर्ड, शस्त्रक्रिया गृह आणि अतिदक्षता विभागातून रोज सुमारे २०१ किलो जैविक कचरा निघतो. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रत्येक कचरा त्या विभागातच त्या-त्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये जमा केला जातो. शिवाय, वॉर्ड व शस्त्रक्रिया गृहाच्या बाहेर त्याची तपासणी करूनच हा कचरा रुग्णालयाबाहेर जातो.
कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र शेड
मेडिकल प्रशासनाने जैविक कचरा व सामान्य कचरा गोळा करण्यासाठी दोन स्वतंत्र शेड तयार केले आहे. रुग्णालयाच्या मागील परिसरात तयार केलेल्या या शेडमध्ये कचरा गोळा होताच अर्ध्या तासाच्या आतमध्ये ‘सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल कपंनी’कडून जैविक कचऱ्याची तर दिवसभऱ्यात महानगरपालिकेकडून सामान्य कचऱ्याची उचल होते.
इन्फेक्शन कंट्रोल समितीकडून तपासणी
मेडिकलमधील जैविक कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात ‘इन्फेक्शन कंट्रोल समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये प्रत्येक विभागातील एक प्रतिनिधी सदस्यांचा समावेश असून दर आठवड्याला ही चमू निरीक्षण करून अहवाल अधिष्ठात्यांना सादर करते. शिवाय तर तीन महिन्यानंतर अहवालांना घेऊन बैठक आयोजित केली जाते. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णालयात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जैविक कचरा व्यवस्थापनेबाबत प्रशिक्षणही दिले जाते.
‘एनएबीएच’ने दिला समाधानाचा अहवाल
‘नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अ‍ॅण्ड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स’ (एनएबीएच) अंतर्गत दिल्ली येथील डॉ. नित्यानंद ठाकूर यांनी दोन दिवस जैविक कचरा व्यवस्थापनेचे मुल्यांकन करून अहवाल सादर केला. यात त्यांनी मेडिकलच्या जैविक कचऱ्याला घेऊन सुधारणा झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Medical become model of biological waste management 'model'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.