मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:31 AM2018-04-13T01:31:39+5:302018-04-13T01:32:06+5:30

बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अ‍ॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली.

Mandira Kolta arrested: fraud case | मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण

मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण

Next
ठळक मुद्देन्यायालयातून जामिनावर सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अ‍ॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली.
कोलतेची आकृती अ‍ॅड एजन्सी आहे. त्याने आपल्या एजन्सीच्या मार्फत अनेक वृत्तपत्रांना लाखोंच्या जाहिराती दिल्या. मात्र, या जाहिरातीची रक्कम संबंधित वृत्तपत्राला न देता कोलतेने ती स्वत:च हडपल्याचा आरोप आहे. त्याच्यावर असलेल्या थकीत रकमेच्या बदल्यात कोलतेने अनेकांना धनादेश दिले. मात्र, त्या खात्यात रक्कमच नसल्याने ते वटले नाही. कोलतेच्या या फसवेगिरीविरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या. काहींनी पोलीस ठाण्यात तर काहींनी थेट वरिष्ठांकडेही तक्रारी केल्या. त्यामुळे कोलतेच्या विरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त वॉरंटही निघाले. मात्र, पोलिसांसोबत लपवाछपवी खेळण्यात सराईत असलेला कोलते काही सापडत नव्हता. गुरुवारी दुपारी तो दुचाकीने जात असल्याचे पाहून बजाजनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोलतेला न्यायालयाने १७ हजार, ५०० रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कोलतेला फसवणूक प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झालेली आहे. त्याला यापूर्वी धंतोली पोलिसांनीही अशाच प्रकारे अटक केली होती.
 

 

Web Title: Mandira Kolta arrested: fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.