Lok Sabha Election 2019; प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांना ‘शो-कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:31 AM2019-03-25T11:31:47+5:302019-03-25T11:41:27+5:30

लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. निवडणुकीसाठी पहिल्या प्रशिक्षणासाठी निवड झालेले अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

Lok Sabha Election 2019; The show-cows for those who absent in the training | Lok Sabha Election 2019; प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांना ‘शो-कॉज’

Lok Sabha Election 2019; प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांना ‘शो-कॉज’

Next
ठळक मुद्देअनेक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे प्रशिक्षण टाळलेजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील मतदानासाठी पहिल्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. निवडणुकीसाठी पहिल्या प्रशिक्षणासाठी निवड झालेले अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
यावेळी रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, नोडल अधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी रवींद्र्र कुंभारे, अन्नधान्य वितरण अधिकारी- वार्डेकर, सहसंचालक लेखा मोना ठाकूर आदी निवडणुकीसंदर्भातील विविध शाखांचे प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच मतदानासाठी व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे असल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे. यासाठी पहिले प्रशिक्षण अनिवार्य असून या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती नोंदविली असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शो-कॉज नोटीस देण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार असून नागपूर व रामटेक लोकसभा मतदार केंद्रामध्ये मतदान केंद्रनिहाय सुमारे २१ हजार ९१२ अधिकारी व कर्मचारी तसेच ओपीओ म्हणून १० हजार ९५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघनिहाय ११ हजार ७२४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच ५ हजार ८६२ अदर पोलिंग ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघनिहाय निवडणुकीसाठी १० हजार १८८ अधिकारी व कर्मचारी तसेच ५ हजार ९४ अदर पोलिंग ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; The show-cows for those who absent in the training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.