नागपूरच्या नंदनवन खून खटल्यातील आरोपी भावांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 08:21 PM2019-07-12T20:21:54+5:302019-07-12T20:23:21+5:30

सत्र न्यायालयाने खून खटल्यातील दोन आरोपी भावांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.

The life imprisonment of the accused brothers in Nagpur's Nandanvan murder case | नागपूरच्या नंदनवन खून खटल्यातील आरोपी भावांना जन्मठेप

नागपूरच्या नंदनवन खून खटल्यातील आरोपी भावांना जन्मठेप

googlenewsNext
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयानेखून खटल्यातील दोन आरोपी भावांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
नीतेश (२५) व अजय भरतलाल शाहू (२८) अशी आरोपी भावांची नावे असून ते सहकारनगर येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव चंद्रशेखर मालोदे (२७) होते. तो विजयालक्ष्मी पंडितनगर येथे राहात होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो आरोपी अजय शाहूसोबत नेहमीच दारू पित होता. तसेच, कधीकधी त्याच्यासोबतच पेंटिंगचे काम करीत होता. २९ मे २०१६ रोजी रात्री १० च्या सुमारास चंद्रशेखर व त्याचा मित्र चेतन सुपारे हे आरोपींच्या घरी गेले होते. दरम्यान, त्यांच्यात एका प्रकरणावरून वाद झाला व आरोपींनी चंद्रशेखरला चाकूने सपासप वार करून ठार मारले. चंद्रशेखरचा मोठा भाऊ राजेंद्रने ३० मे २०१६ रोजी नंदनवन पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.

 

 

Web Title: The life imprisonment of the accused brothers in Nagpur's Nandanvan murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.