रणभूमीतील दिग्गज; दत्ता मेघेंनी भेदला होता ३७ उमेदवारांचा चक्रव्यूह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:38 AM2019-03-14T11:38:39+5:302019-03-14T11:39:04+5:30

तेजसिंहराव भोसले याच्यानंतर काँग्रेसने १९९६ मध्ये दत्ता मेघे यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. मात्र १९९६ ची निवडणूक रामटेकमध्ये गाजली ती ३८ उमेदवारांच्या उमेदवारीने.

Legends of political battle; Datta Meghhe wins out of 37 candidates! | रणभूमीतील दिग्गज; दत्ता मेघेंनी भेदला होता ३७ उमेदवारांचा चक्रव्यूह!

रणभूमीतील दिग्गज; दत्ता मेघेंनी भेदला होता ३७ उमेदवारांचा चक्रव्यूह!

Next
ठळक मुद्देलांबलचक मतपत्रिकेने घेतली मतदारांची परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: तेजसिंहराव भोसले याच्यानंतर काँग्रेसने १९९६ मध्ये दत्ता मेघे यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. मात्र १९९६ ची निवडणूक रामटेकमध्ये गाजली ती ३८ उमेदवारांच्या उमेदवारीने. मेघे यांची रामटेकमध्ये घेराबंदी करण्यासाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले होते. देशात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारचा कार्यकाळ संपला होता. तेव्हाची ही निवडणूक रामटेकच्या मतदारांच्या आजही स्मरणात आहे. त्यावेळी मतपत्रिकांचा उपयोग होत असल्याने उमेदवार, निवडणूक चिन्ह शोधण्यासाठी मतदारांना बरीच कसरत करावी लागली. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल १० हजार ७२७ मते अवैध ठरली होती. हाही या मतदारसंघाला वेगळा विक्रम म्हणावा लागेल. अशाही स्थितीत मेघे यांना निवडणुकीत एकूण मतांच्या ३७.७९ टक्के अर्थात २ लाख ७ हजार १८८ मते मिळाली. मेघेंनी ३७ उमेदवारांचा चक्रव्यूह भेदत रामटेकच्या गडावर काँग्रेसचा झेंडा फडकाविला. शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी १ लाख ८१ हजार ४६६ मते घेत दुसरा क्रमांक गाठला. गोविंदराव वंजारी यांनी लाखावर मते घेतली. कयोमुद्दीन पठाण वगळता इतरांना मात्र चार अंकाच्या वर मते घेता आली नाही. सर्व अपक्ष उमेदवार मिळून एकूण ५४ हजार ८१ मते मिळाली हे विशेष. १९९६ मध्ये मेघे यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे प्रकाश जाधव, जनता दलतर्फे गोविंदराव वंजारी, बोल्शेविक पार्टी आॅफ इंडियातर्फे प्रभूदास ढोरे, भा.रा.इं.काँ (तिवारी)तर्फे केशव शेंडे यांच्यासह अपक्ष म्हणून डॉ. अब्दुल वकील सिद्दीकी, ईश्वरदास सनेश्वर, मोहन कारेमोरे, गणेश खारकर, देवीदास गणवीर, रामदास गावंडे, दिनाजी गिरीधर, कमलबाई घाटे, रेवराम चक्रवर्ती, केशव चरडे, प्रकाशचंद्र तायवाडे, रामकृष्ण दाणी, ज्ञानेश्वर दंढारे, हरीचंद्र धावडे, सुदेश नाईक, कयोमुद्दीन पठाण, अजय पाठक, लीलाधर पालीवाल, पांडुरंग पौनीकर, लता फुलझेले, वीरेंद्र बागडे, ज्ञानेश्वर भगत, मनोहर डोेंगरे, इंद्रराजसिंग मसराम, राजू माहुरे, प्रकाश लोणारे, डॉ. गजानन वझलवार, बबन वानखेडे, शंकर चोखारे, कचरू शिंगाडे, रामकृष्ण शेंडे, परमात्मा सातपुते, मानसिंग सेंगर हे निवडणूक रिंगणात होते.

Web Title: Legends of political battle; Datta Meghhe wins out of 37 candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.