नागपूर मेट्रो प्रकल्पात अखेरचे सेगमेंट लॉन्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:39 PM2018-12-12T22:39:47+5:302018-12-12T22:41:04+5:30

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपॉरेशनच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पातील एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावरील हॉटेल रॅडिसन चौक, जेपीनगर मेट्रो स्टेशनसमोरील व्हाय-डक्ट कामातील स्पॅनमध्ये अखेरचा सेंगमेंट बुधवारी लॉन्च करण्यात आले. कामाच्या वेगामुळे खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. मेट्रो मार्गावर वर्ष-२०१९ च्या मार्चअखेरीस मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सेंटमेंट लॉन्चिंगनंतर पत्रपरिषदेत दिली.

The last segment launches in the Nagpur Metro Project | नागपूर मेट्रो प्रकल्पात अखेरचे सेगमेंट लॉन्च 

नागपूर मेट्रो प्रकल्पात अखेरचे सेगमेंट लॉन्च 

Next
ठळक मुद्देएअरपोर्ट दक्षिण ते सीताबर्डी रिच-१ : मेट्रो मार्चमध्ये धावणार

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपॉरेशनच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पातील एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावरील हॉटेल रॅडिसन चौक, जेपीनगर मेट्रो स्टेशनसमोरील व्हाय-डक्ट कामातील स्पॅनमध्ये अखेरचा सेंगमेंट बुधवारी लॉन्च करण्यात आले. कामाच्या वेगामुळे खापरी ते सीताबर्डीपर्यंत १३ कि़मी. मेट्रो मार्गावर वर्ष-२०१९ च्या मार्चअखेरीस मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सेंटमेंट लॉन्चिंगनंतर पत्रपरिषदेत दिली. 


एअरपोर्ट साऊथ ते सीताबर्डीपर्यंतच्या ७.८ कि़मी. मार्गावर ०.५ कि़मी. पॉकेट ट्रॅकमध्ये सात एलिव्हेटेड स्टेशन राहणार आहे. ४.५ कि़मी. लांब रूळ टाकण्यात आला आहे. व्हाय-डक्टमध्ये ३१६ स्पॅन असून त्यापैकी २९६ स्पॅन व्हाय-डक्टकरिता आणि २० स्पॅन पॉकेट ट्रॅकसाठी आहेत. व्हाय-डक्टची लांबी २२ मी., २५ मी., २८ मी., ३१ मी. आणि ३४ मीटर आहे. रिच-१ च्या या मार्गावर १६५६ पाईल्स, ३०९ पाईल कॅप, ३०९ पिलर, २८३ पिलर कॅप, १३ पोर्टल बीम आणि ६२ पिलर आर्मचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये सर्वाधिक १३६ पाईल कास्ट तर जानेवारी २०१७ मध्ये सर्वाधिक २७ पाईल कॅप तयार करण्यात आल्या होत्या. पायलिंगच्या कामासाठी सात हॅड्रोलिक रिंगसह १५ ट्रायपोड तैनात करण्यात आले. ९५ टक्के पायलिंगची कामे २४ महिन्यात पूर्ण करण्यात आली. पॉईल कॅप, पिलर, पिलर कॅपची कामे १२ मार्च २०१६ आणि १५ एप्रिल २०१६ ला सुरू करण्यात आली होती. २६९४ सेंगमेंटचे कास्टिंग २१ नोव्हेंबर २०१८ ला पूर्ण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
व्हाय-डक्ट बनविण्यासाठी छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडण्यात आला. वर्धा मार्गावरील डेबलडेकर पुलामुळे व्हाय-डक्टची उंची जमिनीपासून २५ मीटर आणि रेल्वेमुळे एकूण उंची २७ मीटर राहील. मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना नागपूरचे सौंदर्य न्याहाळता येईल. रस्ता ब्लॉक न करता आव्हानात्मक बांधकाम वेळेत पूर्ण केले. कामासाठी ६० हजार मेट्रिक टन सिमेंट,२८ हजार मेट्रिक टन स्टील लागल्याची माहिती मेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी दिली.
यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अभियांत्रिकी चमूचा दीक्षित यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पत्रपरिषदेत महामेट्रोचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर, उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The last segment launches in the Nagpur Metro Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.