जरा हटके! अलेक्साला मिळणाऱ्या काही मजेशीर आज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:32 PM2018-11-15T12:32:21+5:302018-11-15T12:33:00+5:30

तंत्रज्ञानाने केलेली अलीकडची प्रगती म्हणजे अलेक्सा. अलेक्साची व्याख्या सांगायची झाली तर ती, मौखिक आज्ञा स्वीकारणारे तंत्रशुद्ध यंत्र, अशी करता येईल.

Just different! Some funny commands for Alexa | जरा हटके! अलेक्साला मिळणाऱ्या काही मजेशीर आज्ञा

जरा हटके! अलेक्साला मिळणाऱ्या काही मजेशीर आज्ञा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: तंत्रज्ञानाने केलेली अलीकडची प्रगती म्हणजे अलेक्सा. अलेक्साची व्याख्या सांगायची झाली तर ती, मौखिक आज्ञा स्वीकारणारे तंत्रशुद्ध यंत्र, अशी करता येईल. अलेक्सा हा शब्द अलेक्झांडरचा स्त्रीलिंगी अवतार आहे. ग्रीक भाषेत अलेक्साचा अर्थ सुंदर स्त्री असा होतो. या अलेक्साला कालपरवापासून ट्विटरवासियांनी काही मजेशीर कामं सांगायला सुरुवात केली आहे.. त्याची एक झलक..

अलेक्सा तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद कर..

अलेक्सा, वर्गणी मागायला कुणी आलं तर, घरी कुणी नाहीये असं सांग..

पुणेरी अलेक्सा- १ ते ४ दरम्यान कुठलीही आॅर्डर स्वीकारली जाणार नाही...

अलेक्सा. दूध उतू जाईल बघ..

अलेक्सा- गुगल असिस्टंटला सकाळचा ७ चा अलार्म लावायला सांग..

अलेक्सा, म्होर हो, चा अनुवाद सांग बरं..

अलेक्सा, १५ लाख या जन्मी मिळतील का गं..

अलेक्सा... ऐ, अलेक्सा..
अलेक्सा- अं... मी नाही येत जा...

ट्विटरवासियांनी अलेक्साला आधीच्या रामागडीचा किंवा रामूकाकाचा आधुनिक अवतार बनवले असे म्हणता येईल.

Web Title: Just different! Some funny commands for Alexa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.