दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..!

By admin | Published: November 24, 2014 01:19 AM2014-11-24T01:19:25+5:302014-11-24T01:19:25+5:30

‘दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है...’ अशा लोकप्रिय गझलांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या गझलांनी सुप्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांनी रसिकाना जिंकले.

It sounds like crying with the walls! | दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..!

दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..!

Next

प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टचे आयोजन : पंकज उधास यांचे सादरीकरण
नागपूर : ‘दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है...’ अशा लोकप्रिय गझलांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या गझलांनी सुप्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांनी रसिकाना जिंकले. गझल, शेर, नज्म आणि अनेक शायरांच्या शायरीचा आठव करीत रसिकांना घायाळ करतानाच पंकज उधास यांनी रसिकांना जिंकले. वन्समोअरची दाद देत नागपूरकरांची एक सायंकाळ आज गझल सादरीकरणाने सुरेल झाली.
प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टच्यावतीने गझलगायक पंकज उधास यांच्या गझलांचा ‘नायाब’ हा कार्यक्रम आज दीनानाथ हायस्कूल, काँग्रेसनगरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम स्व. प्रमोद महाजन यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमोद महाजन यांची कन्या पूनम यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पंकज उधास यांनी रसिकांचा ताबा घेतला. त्यांनी लोकप्रिय गझलांच्या सादरीकरणाने रसिकांची दाद घेतली. काहीसा संथपणे सुरु झालेल्या कार्यक्रमाने मात्र नंतर रसिकांची पकड घेतली. यावेळी ‘निकलो ना बेनकाब...जमाना खराब है.., सब को मालूम है की मै शराबी नही..., जिए तो जिए कैसे..., हुअी महंगी बहोतही शराब तो...., चांदी जैसा रंग है तेरा....’ आदी गझलांनी त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी अनेक लोकप्रिय गझलांना रसिकांनी वन्समोअरची दाद दिली. याप्रसंगी कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सतीश गोयल, विजय श्रीवास्तव, दाणी, परांजपे, मूर्ती, झंवर, घोष, सविता राजूरकर आदींचा सत्कार करण्यात आला. विशेषत: गझलांच्या या कार्यक्रमाला नागपूरकर रसिकांनी खच्चून गर्दी केली होती. थंड वाहणारा वारा आणि गझलचे हळवे स्वर असा समां यावेळी जमला. (प्रतिनिधी)

Web Title: It sounds like crying with the walls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.