अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता

By नरेश डोंगरे | Published: November 3, 2023 07:47 PM2023-11-03T19:47:08+5:302023-11-03T19:47:17+5:30

‘माझे गाव माझी अयोध्या’ उपक्रम राबविणार

Invitation to 15 lakh households in Vidarbha for the Ayodhya temple | अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता

अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता

नागपूर : अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन २२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभरात वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारीदरम्यान विदर्भातील १५ लाखांहून अधिक घरांमध्ये निमंत्रणाच्या अक्षता वाटण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली. यासंदर्भात शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

५ नोव्हेंबरला देशभरातील २०० कार्यकर्त्याना श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजीत अक्षता व प्रभू श्रीरामाचे छायाचित्र व माहिती पत्रक दिले जाणार आहे. या अक्षता आणण्यासाठी महाराष्ट्रातून १० तर विदर्भातून दोन कार्यकर्ते जाणार आहेत. २७ नोव्हेंबरला नागपुरात या अक्षता आल्यावर पोद्दारेश्वर मंदिरात पूजा होईल त्यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यात या अक्षताचे घराघरात वाटप होईल.

या अक्षता विदर्भातील १० हजार गावांमध्ये वाटण्यात येतील. अयोध्येतील मंदिराच्या लोकार्पणाला सर्वाना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 'माझा परिसर माझे अयोध्या, माझे गाव माझे अयोध्या' अंतर्गत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत सकाळी ११ वाजेपर्यंत गावागावात ध्वज उभारण्यात येतील. तो सोहळा गावागावात लाईव्ह दाखवण्याची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती शेंडे यांनी दिली.

Web Title: Invitation to 15 lakh households in Vidarbha for the Ayodhya temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.