नागपुरात भारतातील पहिल्या मेट्रो सेफ्टी पार्कचे उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:09 AM2018-11-02T01:09:10+5:302018-11-02T01:10:17+5:30

महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथे निर्मित सेफ्टी पार्क देशातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सेफ्टी पार्कची अनोखी संकल्पना राबविल्याबद्दल नागपूर मेट्रोचे कौतुक केले. नागपूर मेट्रोतर्फे राबविलेल्या सेफ्टी पार्क प्रकल्पातून प्रेरणा घेत देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांनी अशा पार्कची उभारणी करावी, असे आवाहन मिश्रा यांनी केले.

Inauguration of India's first Metro Safety Park in Nagpur | नागपुरात भारतातील पहिल्या मेट्रो सेफ्टी पार्कचे उद्घाटन 

नागपुरात भारतातील पहिल्या मेट्रो सेफ्टी पार्कचे उद्घाटन 

Next
ठळक मुद्दे देशात असे पार्क उभारावेत : केंद्रीय सचिव मिश्रा यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथे निर्मित सेफ्टी पार्क देशातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सेफ्टी पार्कची अनोखी संकल्पना राबविल्याबद्दल नागपूरमेट्रोचे कौतुक केले. नागपूर मेट्रोतर्फे राबविलेल्या सेफ्टी पार्क प्रकल्पातून प्रेरणा घेत देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांनी अशा पार्कची उभारणी करावी, असे आवाहन मिश्रा यांनी केले.
हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथील भारतातील पहिल्या मेट्रो सेफ्टी पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक संचालक डॉ. बृजेश दीक्षित, दिल्ली मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह, चेन्नई मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार बन्सल, मेगा मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आय.पी.गौतम, लखनौ मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक कुमार केशव, एनसीआरटीसी मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार सिंह, नागपूर मेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, नागपूर मेट्रोचे वित्त संचालक एस. शिवमाथन, नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.
लिटील वूड येथे महामेट्रोतर्फे ५५०० झाडे लावली असून यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जगली आहेत. विविध प्रकारची आणि प्रजातीची झाडे लावण्यात आली असून या संपूर्ण प्रकल्पाला राज्याच्या वन विभागाने सहकार्य केले आहे. लिटील वूडजवळ प्रस्तावित ६०० चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेवर सेफ्टी पार्क तयार करण्यात आले आहे. यात तीन षटकोनी संरचना वेगवेगळ्या उद्देशाने कार्य करेल. सेफ्टी पार्कचे सौंदर्यपूर्ण डिझाईन करण्यात आले असून ते नागरिकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने आकर्षक ठरणार आहे.
विविध शासकीय आणि अशासकीय विभागात कार्य करणाऱ्यांना, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना आणि इतर सर्व नागरिकांना सेफ्टी पार्कमध्ये बांधकामाशी संबंधित सर्व क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या सुरक्षा नियमाची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुरक्षेसंबंधित मॉडेल प्रशिक्षण संस्था म्हणून हा पार्क काम करणार आहे. त्यामुळे सुरक्षाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: Inauguration of India's first Metro Safety Park in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.