नागपूर मनपा सभागृहावर अवैध कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:03 AM2018-07-10T01:03:53+5:302018-07-10T01:05:01+5:30

अभ्यंकरनगर क्रीडा मैदानावरील महापालिका सभागृहावर काही लोकांनी अवैध कब्जा क रून सभागृहाला कुलूप ठोकले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी पदाधिकारी, आयुुक्त, सहायक आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. लाखो रुपये खर्च करूनही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Illegal occupation of Nagpur Municipal Hall | नागपूर मनपा सभागृहावर अवैध कब्जा

नागपूर मनपा सभागृहावर अवैध कब्जा

Next
ठळक मुद्देअधिकारी, पदाधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभ्यंकरनगर क्रीडा मैदानावरील महापालिका सभागृहावर काही लोकांनी अवैध कब्जा क रून सभागृहाला कुलूप ठोकले आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी पदाधिकारी, आयुुक्त, सहायक आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. लाखो रुपये खर्च करूनही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित सभागृहात आवश्यक परवानगी घेतल्यानंतर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या शाखेतर्फे कौटुंबिक योगाभ्यास केंद्र सुरू करण्यात आले होते. मंडळाचे सचिव राम खांडवे व भाजपाच्या नगरसेविका वर्षा ठाकरे यांनी या योग केंद्राचे उद्घाटन केले होते. येथे योग शिकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक यायला लागले. परंतु काही लोकांनी या परिसरावर अवैध कब्जा केला आहे.
यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवक यांच्याकडेही तक्रारी केल्या. परंतु उपयोग झाला नाही. योगासाठी कक्ष उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. असे असूनही येथील सभागृहावर अवैध कब्जा कायम आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतरही सभागृहावरील कब्जा कायम आहे.

Web Title: Illegal occupation of Nagpur Municipal Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.