शेकडो ओबीसी बांधवांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा, भदंत सुरेई ससाई यांच्याकडून २२ प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:09 AM2017-12-26T04:09:16+5:302017-12-26T04:09:31+5:30

नागपूर : भगवान बुद्धांचा मार्ग हाच जीवन जगण्याचा श्रेष्ठतम मार्ग आहे, याची खात्री पटल्यानेच विविध जाती समूह बुद्धांच्या वाटेने मार्गक्रमण करीत आहेत.

Hundreds of OBC brothers took initiation of Buddhist Dhamma, 22 vows from Bhadan Surai Sasai | शेकडो ओबीसी बांधवांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा, भदंत सुरेई ससाई यांच्याकडून २२ प्रतिज्ञा

शेकडो ओबीसी बांधवांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा, भदंत सुरेई ससाई यांच्याकडून २२ प्रतिज्ञा

Next

नागपूर : भगवान बुद्धांचा मार्ग हाच जीवन जगण्याचा श्रेष्ठतम मार्ग आहे, याची खात्री पटल्यानेच विविध जाती समूह बुद्धांच्या वाटेने मार्गक्रमण करीत आहेत. याच अनुषंगाने सोमवारी दीक्षाभूमी येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत शेकडो ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी या ओबीसी बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. पंचशील, बुद्धवंदनेसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञाही दिल्या. हनुमंतराव उपरे यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ हे ओबीसींकरिता धम्मदीक्षा अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत गेल्या वर्षी मनुस्मृती दहन दिनीच दीक्षाभूमीवर शेकडो बौद्धबांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या अनुषंगाने सार्वजनिक धम्मदीक्षा समारोह समितीच्यावतीने पुन्हा दीक्षाभूमीवर ओबीसी धम्मदीक्षा समारोह आयोजित करण्यात आला होता.
तत्पूर्वी बौद्ध धम्माची दीक्षा घेणारी ओबीसीबांधव हजारो लोकांसह संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीने दीक्षाभूमीवर पोहोचले. दीक्षाभूमीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई व भिक्खू संघाने ओबीसी बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या वेळी बंजारा, हलबा, मातंग, तेली, कुणबी, माळी, अग्रवाल इत्यादी अनेक जाती समूहातील लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या वेळी महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह-लडाखचे प्रमुख भदंत संघसेना यांनी मार्गदर्शन केले. प्रा. रमेशभिया राठोड अध्यक्षस्थानी होते.
>७६००च्यावर परीक्षार्थींनी दिली धम्मज्ञान परीक्षा
मनुस्मृती दहन दिनानिमित्त ‘बुद्ध धम्मज्ञाना’चा मागोवा घेणाºया परीक्षेची विक्रमी नोंद सोमवारी नागपुरात करण्यात आली. ‘बुद्ध व त्यांचा धम्म’ या ग्रंथावर आधारित ही परीक्षा होती, ज्यामध्ये ७६६० परीक्षार्थींनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी बसून ही परीक्षा देत नव्या विक्रमाला गवसणी घातली. युवा भीम मैत्रेय संघ(यूबीएमएस)च्या पुढाकाराने ही परीक्षा घेण्यात आली होती. या विक्रमाचा डेटा गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Hundreds of OBC brothers took initiation of Buddhist Dhamma, 22 vows from Bhadan Surai Sasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.