नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र

By कमलेश वानखेडे | Published: March 6, 2024 07:53 PM2024-03-06T19:53:22+5:302024-03-06T19:54:07+5:30

चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी

How come Namo Yuva Mahasamelana was allowed?; Anil Deshmukh's letter to Rajya Sabha | नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र

नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र

नागपूर : ४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने “नमो युवा महासंमेलन” चे आयोजन करण्यात आले होते. परंतु हा राजकीय कार्यक्रम शासकीय जागेत करीत असतांना सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली. यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करुन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे नेते आ. अनिल देशमुख यांनी राज्यपांला पत्र लिहुन केली आहे.

राज्यपांलाना लिहलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, कोणताही कार्यक्रम करीत असतांना साधारणता अगोदर परवागी घेण्यात येते आणि नंतर कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. परंतु अगोदर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि नंतर विद्यापीठाकडुन परवानगी घेण्यात आली. परवानगी देतांना काही नियम व अटी साधरणता लावल्या जातात. परंतु या कार्यक्रमला कोणतेही नियम व अटी लावल्या नसल्याचे माझ्या माहितीस आहे.

विद्यापीठाचे काम सुरु असलेल्या दिवशी ही परवागी कशी देण्यात आली. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला त्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर हा विद्यापीठाचा मुख्य शैक्षणिक परिसर आहे. तसेच याच परिसरात विद्यापिठाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे. या परिसरात जवळपास ८० टक्के कर्मचारी व अधिकारी ज्यामधे कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव यांची कार्यालये आहेत. असे असतांनाही कामकाज्या दिवशी ही परवानगी का देण्यात आली ? विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशाकीय इमारत परिसर हा शांतता झोन आहे. असे असतांना तेथे जोरजोराने नारेबाजी करण्यात आली. व्यवस्थापन परिषद हे विद्यापिठाच्या हिताचे निर्णय घेणारे सर्वोच्च प्राधिकरण आहे. अशा प्राधीकरणाने राजकीय कार्यक्रम विद्यापीठ परिसरात घेण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: How come Namo Yuva Mahasamelana was allowed?; Anil Deshmukh's letter to Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.