घरबसल्या नोंदवा आॅनलाईन तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:38 AM2017-11-03T01:38:28+5:302017-11-03T01:38:52+5:30

उपराजधानीतील नागरिकांना आता आजपासून कोणत्याही पोलीस ठाण्यात आॅनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार करणारी व्यक्ती नागपुरातील प्रकरणाशी संबंधित तक्रार कोणत्याही गाव अथवा प्रांतातून नोंदवू शकतो.

Home Report Online Complaint | घरबसल्या नोंदवा आॅनलाईन तक्रार

घरबसल्या नोंदवा आॅनलाईन तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्त : आठ दिवसात घेणार कारवाईचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील नागरिकांना आता आजपासून कोणत्याही पोलीस ठाण्यात आॅनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार करणारी व्यक्ती नागपुरातील प्रकरणाशी संबंधित तक्रार कोणत्याही गाव अथवा प्रांतातून नोंदवू शकतो. त्या तक्रारीचे स्वरूप पाहून त्यावर कारवाई करायची किंवा ती तक्रार अदखलपात्र (एनसी) करायची, त्याबाबतचा संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी आठ दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे आणि पोलीस उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते.
पोलीस आयुक्तालयात नागरिक सुविधा केंद्राला सुरूवात झाली. सीसीटीएनएस च्या माध्यमातून सिटीझन पोर्टल कार्यान्वित झाले असून, त्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी ई तक्रारीची सोय करण्यात आल्याचे डॉ. व्यंकटेशम म्हणाले. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ई तक्रार नोंदविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध असेल. नागपूर पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन ती तक्रार नोंदवता येईल. संबंधित व्यक्तीला आपले, नाव, पत्ता नोंदवावा लागेल. तक्रारीत घटनास्थळ कोणत्या ठाण्याच्या हद्दीत येते त्या ठाण्याचे नाव, ठाण्याचे नाव माहीत नसेल तर संबंधित झोन वा शहराचे नाव नोंदविता येईल.
तक्रार पोर्टलवरून मिळाल्यानंतर तक्रारकर्त्याला एक मेसेज मिळेल. नंतर ती संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात येईल. तेथील ठाणेदार, त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी दुसºया अधिकाºयाकडे देईल.
त्या संबंधीचा मेसेज तक्रारकर्त्याला मिळेल. त्यात ही तक्रार कोणत्या अधिकाºयाकडे तपासासाठी आहे, त्याचे नाव आणि संपर्क क्रमांक मिळेल. त्यानंतर तक्रार दखलपात्र असेल तर तक्रारकर्त्याला ठाण्यात बोलवून घेऊन त्याची पुन्हा रीतसर तक्रार नोंदवून घेण्यात येईल आणि नंतर गुन्हा दाखल होईल. तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्यास तसे देखील कळविण्यात येईल. आठ दिवसात ही प्रक्रिया संबंधित पोलीस ठाण्यातून पूर्ण करण्यात येईल.
पत्रकार परिषदेत सुजल वासनिक या कामठीतील शाळकरी मुलाच्या अपहरणाच्या संबंधाने प्रश्न उपस्थित झाले.
त्यावर बोलताना गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रकरणाचा कामठी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असल्याची माहिती दिली. मुन्ना यादव संबंधाने विचारलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देताना पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
पोलीस उपायुक्तांचा राहणार ‘वॉच’
दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाईन तक्रारीचा शुभारंभ करताना पुण्याहून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अनेकांनी आॅनलाईन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती नोंदलीच गेली नाही. या संबंधाने पोलीस आयुक्तांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी तांत्रिक अडचणी विशद केल्या. आता मात्र प्रत्येक ठाण्यात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे ई तक्रार नोंदवून घेण्यात अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले. ई तक्रारीवर परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांचे आणि गुन्हेशाखेच्या उपायुक्तांचेही थेट लक्ष राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Home Report Online Complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.