नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:06 AM2019-06-15T00:06:28+5:302019-06-15T00:07:09+5:30

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला अटक करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) दोन वारांगनांना ताब्यात घेतले.

Highprofile sex racket exposed in Nagpur | नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वारांगना ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला अटक करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) दोन वारांगनांना ताब्यात घेतले. साबिया कौसर शौकत उल्लाह खान (साबिया रियासत अहमद, वय ३३) असे रॅकेट चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे. ती फ्रेण्डस कॉलनीतील कोलबा स्वामी कॉलनीत राहते.
साबिया गेल्या अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालविते. मोठमोठे हॉटेल्स, लॉज आणि फार्म हाऊसमध्ये ती हायप्रोफाईल वारांगना पोहचवते. तिच्याकडे महाविद्यालयीन विद्यार्थिनींपासून पतीपासून विभक्त झालेल्या तसेच विवाहित महिलांची भली मोठी यादी आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार ती पाहिजे त्या ठिकाणी वारांगना उपलब्ध करून देते. तिच्या गोरखधंद्याची कल्पना मिळताच एसएसबीने कारवाईचा सापळा लावला. साबियासोबत पोलिसाच्या पंटरने संपर्क साधून दोन वारांगनांची मागणी केली. एक महाविद्यालयीन तरुणी (वय २२) आणि दुसरी महिला (वय ३२) उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवून साबियाने वारांगनांना घेऊन जाण्यासाठी ग्राहकाला पागलखाना चौकाजवळ बोलविले. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी पोलिसांचे दोन ग्राहक पागलखाना चौकाजवळ पोहचले. त्यांना साबियाने देहविक्रय करणाऱ्या दोन वारांगना उपलब्ध करून देताच एसएसबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. साबियाच्याविरुद्ध मानकापूर ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, एएसआय दामोदर राजुरकर, सुभाष खेडकर, बळीराम रेवतकर, हवलदार मुकूंदा गारमोरे, संजय पांडे, मनोज चव्हाण, नायक चंद्रशेखर घागरे, छाया राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्या प्रीती सावरकर आणि सविता रेलकर यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Highprofile sex racket exposed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.