कोंबडीने वाढवला वाद : तलवार चालली, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:54 PM2019-06-10T21:54:58+5:302019-06-10T21:56:06+5:30

कोंबडीने एकाच्या घरात शिरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद वाढवला. हा वाद एवढा विकोपाला गेला की एकाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

Hen raised dispute: Assault with Swords, one seriously injured | कोंबडीने वाढवला वाद : तलवार चालली, एक गंभीर जखमी

कोंबडीने वाढवला वाद : तलवार चालली, एक गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोंबडीने एकाच्या घरात शिरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद वाढवला. हा वाद एवढा विकोपाला गेला की एकाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.
समतानगरातील उन्नती कॉलनीत राजेंद्र रमाशंकर यादव (वय ४२) आणि मुन्ना कटरे आजूबाजूला राहतात. त्यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून कुरबूर सुरू राहते. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास आरोपी मुन्नाची कोंबडी यादवच्या घरात शिरली. यादवने तिला हुसकावून लावले. त्यामुळे मुन्ना कटरे, त्याची पत्नी आणि दोन मुली घराबाहेर आल्या. कोंबडीला पळवून का लावले, असे विचारत त्यांनी यादवसोबत वाद घातला. वाद वाढत गेला आणि आरोपी मुन्नाने तलवार काढून यादववर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर, हातावर जोरदार वार केले. या हल्ल्यात यादव गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपी कटरेला कसेबसे आवरले. जखमी यादवला डॉक्टरकडे नेण्यात आले. जरीपटका पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी यादव यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी मुन्ना कटरे, त्याची पत्नी आणि दोन मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

 

Web Title: Hen raised dispute: Assault with Swords, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.