खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा अमरावती विद्यापीठाला आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 21, 2023 06:11 PM2023-02-21T18:11:26+5:302023-02-21T18:14:30+5:30

राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारला

HC order to Amravati University over the decision on the entry of athletes to national sports competitions | खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा अमरावती विद्यापीठाला आदेश

खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या; हायकोर्टाचा अमरावती विद्यापीठाला आदेश

googlenewsNext

नागपूर : वुडबॉल खेळाडू रोहित नांदूरकर व मिनी गोल्फ खेळाडू पवन डोईफोडे यांना राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रवेश देण्यावर निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूंना दिला आहे. या स्पर्धेला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. असे असताना त्यांना राष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अमरावती विद्यापीठात क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ नसल्यामुळे खेळाडूंवर अन्याय झाला, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

न्यायालयाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामधील कलम १२ (७) अनुसार या खेळाडूंच्या तक्रारीवर कुलगुरूही निर्णय घेऊ शकतात, ही बाब लक्षात घेता सदर आदेश दिला व खेळाडूंची याचिका निकाली काढली. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. मोहन सुदामे यांनी बाजू मांडली.

Web Title: HC order to Amravati University over the decision on the entry of athletes to national sports competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.