फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:29 PM2018-07-16T22:29:00+5:302018-07-16T22:29:53+5:30

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली विविध वयोगटातील महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचा रोजगार देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीने तिच्या साथीदारासोबत संगनमत करून मोहन महादेवराव मोहरपुरे (वय २९) यांना सव्वालाखाचा गंडा घातला.

In The Friendship Club friendship with women and inducement of big money | फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचे आमिष

फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचे आमिष

googlenewsNext
ठळक मुद्देघातला सव्वालाखाचा गंडा : फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली विविध वयोगटातील महिलांशी मैत्री अन् बक्कळ पैशाचा रोजगार देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीने तिच्या साथीदारासोबत संगनमत करून मोहन महादेवराव मोहरपुरे (वय २९) यांना सव्वालाखाचा गंडा घातला.
मोहरपुरे न्यू बिडीपेठमधील सुभेदार लेआऊटमध्ये राहतात. १५ जूनला त्यांनी फ्रेण्डशिप क्लबची जाहिरात बघून ७४२०९१५६३० वर संपर्क केला. पलीकडून बोलणाऱ्या दिव्या पाटील नामक तरुणीने मोहरपुरे यांना निशा फ्रेण्डशिप क्लबची मेंबरशिप घेण्यासाठी एक हजार रुपये रजिस्ट्रेशन फी एसबीआयच्या ३६५४१६४६९९५ खात्यात जमा करायला सांगितले. मोहरपुरेने ही रक्कम भीम अ‍ॅपवरून भरल्यानंतर तिने आमच्या रामदासपेठेतील कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळेल, २५ हजार रुपये महिना मिळेल, असे सांगितले. त्यानंतर अधिक माहितीसाठी क्लबचा कथित व्यवस्थापक रितेश याच्या मोबाईल क्रमांक ९१३७६६९६९७ वर संपर्क करण्यास सांगितला. रितेशशी बोलणे केल्यानंतर त्याने मोहरपुरेला भलताच रोजगार सांगितला. नवनवीन महिला मुलींशी मैत्री अन् त्यातून बक्कळ पैसा कमविता येईल, असे सांगून १५ जून ते ९ जुलैपर्यंत १ लाख, २१ हजार, ८०० रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतरही आरोपी मोहरपुरेंना वेगवेगळे कारण सांगून १२ जुलैपर्यंत पैशाची मागणी करीत राहिले. त्यांची बनवाबनवी लक्षात आल्याने मोहरपुरेने आपली रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्याच्याशी संपर्क तोडला. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने मोहरपुरेंनी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

अनेक दिवसांपासून गोरखधंदा
फ्रेण्डशिप क्लबच्या नावाखाली देशातील कोणत्याही शहरात महिला-मुलींशी थेट संपर्क आणि मैत्री करून देण्याच्या नावाखाली आणि त्यातून मोठी रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, पोलिसांना या रॅकेटला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते.

Web Title: In The Friendship Club friendship with women and inducement of big money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.