नागपुरात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:21 AM2019-03-23T11:21:47+5:302019-03-23T11:39:32+5:30

भीम अ‍ॅपच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आपला मोबाईल नंबर फीड करून वायुसेनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सव्वालाखाचा गंडा घातला.

Fraud of retired IAF officer in Nagpur | नागपुरात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

नागपुरात वायुसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक

Next
ठळक मुद्देसव्वा लाखाचा गंडा गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीम अ‍ॅपच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आपला मोबाईल नंबर फीड करून वायुसेनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सव्वालाखाचा गंडा घातला.
चैतन्य कुमार मिश्रा असे फसवणूक झालेल्या अधिकाºयाचे नाव असून ते गिट्टीखदानमधील स्वामी कॉलनीत राहतात. आॅक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी कानपूरहून नागपूरला येण्यासाठी पत्नी आणि मुलाचे चेन्नई एक्स्प्रेसमधील तिकीट आॅनलाईन बुक केले होते. त्याची रक्कम भीम अ‍ॅपच्या माध्यमातून मिश्रा यांनी केली.
पहिल्यांदा तिकिटाचे पैसे भरूनही ते जमा न झाल्याचे कळाल्याने त्यांनी दुसऱ्यांदा आॅनलाईन पेमेंट केले. यावेळी मिश्रा यांनी कस्टमर केअरच्या नावाखाली दिलेल्या नंबरवर संपर्क केला असता तेथील व्यक्तीने त्यांना त्यांची रक्कम परत करण्याची थाप मारून बँक खात्याची पूर्ण माहिती घेतली. त्याआधारे त्यांच्याकडून त्यांच्या खात्यातील १ लाख, २० हजार रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर मिश्रा यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर
शासकीय अ‍ॅपवर कस्टमर केअरच्या नावाखाली सायबर गुन्हेगार आपला मोबाईल नंबर फीड करून नागरिकांना अशा प्रकारे चुना लावत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Fraud of retired IAF officer in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.