भूजल पातळी खोलात गेल्यामुळे फ्लोराईड वाढले : यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 09:37 PM2019-06-26T21:37:23+5:302019-06-26T21:38:44+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.

Fluoride increased due to groundwater levels down: Situation in Yavatmal district | भूजल पातळी खोलात गेल्यामुळे फ्लोराईड वाढले : यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती

भूजल पातळी खोलात गेल्यामुळे फ्लोराईड वाढले : यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती

Next
ठळक मुद्दे‘एमपीसीबी’ची हायकोर्टात माहिती

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी खोलात गेल्यामुळे पाण्यामधील फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)ने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, भूजल पातळी वाढविणे हा या समस्येवर उपाय असल्याचे सांगितले.
यासंदर्भात देवानंद पवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ‘एमपीसीबी’ने ही शास्त्रीय बाजू स्पष्ट केली. त्यानंतर राज्य सरकारने उपाययोजनांची माहिती दिली. फ्लोराईडचे अतिरिक्त प्रमाण आढळून आलेल्या दोन बोअरवेलवर लाल खूण करण्यात आली आहे. त्या बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरू नये अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच, संबंधित नागरिकांना पाईप लाईनद्वारे पिण्यायोग्य पाणी पुरविले जात आहे असे सरकारने सांगितले. न्यायालयाने हे मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी आठ आठवडे तहकूब केली.
यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ५०० लोकवस्त्यांमध्ये नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. हाडे ठिसुळ होणे, दात खराब होणे, किडनीचे आजार इत्यादी आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या जलसंसाधन मंत्रालयाने फ्लोराईडयुक्त पाणी धोकादायक असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या अभ्यासाचा उल्लेख होता. भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याचे म्हटले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याचा उल्लेख आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १४ जणांचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Fluoride increased due to groundwater levels down: Situation in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.