नागपूर फ्लार्इंग क्लब घेणार भरारी

By admin | Published: December 28, 2016 03:26 AM2016-12-28T03:26:30+5:302016-12-28T03:26:30+5:30

नागपूर फ्लाईंग क्लबला केंद्र शासनाच्या नागरी विमान विभागामार्फत विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.

Fleet will take the flying club of Nagpur | नागपूर फ्लार्इंग क्लब घेणार भरारी

नागपूर फ्लार्इंग क्लब घेणार भरारी

Next

उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता : डीजीसीएची मंजुरी, ९० दिवसासाठी पायलट प्रशिक्षण
नागपूर : नागपूर फ्लाईंग क्लबला केंद्र शासनाच्या नागरी विमान विभागामार्फत विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या महासंचालक नागरी विमान कार्यालयातर्फे विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी पुन्हा परवानगी दिल्याचे पत्र उपसंचालक डीजीसीए यांचेकडून प्राप्त झाले आहे.
नागपूर फ्लाईंग क्लबचा विमान चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी डीजीसीएकडून परवानगी मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा तसेच तांत्रिक व प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या डीजीसीएच्या चमूने नुक्तीच नागपूर फ्लाईंग क्लबला भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली होती. त्यानुसार नागपूर फ्लाईंग क्लबला ९० दिवसासाठी पायलट प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.
नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा तसेच पाठपुरावा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक तथा महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, मुख्य उड्डाण निर्देशक शीव जयस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच फ्लाईंग क्लब पुन्हा एकदा विमान प्रशिक्षणासाठी सज्ज झाला आहे. फ्लाईंग क्लबमध्ये १७ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून १० नवीन प्रशिक्षणार्थी निवड झाली आहे. नागरी उड्डाण महासंचालकांच्या कार्यालयातर्फे विमान उड्डाण प्रशिक्षणाची परवानगी मिळाल्यामुळे फ्लाईंग क्लब आता नवी झेप घेत आहे. विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष अनुप कुमार यांनी नागपूर फ्लाईंग क्लब पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात आवश्यक सुधारणा करण्यात येतील, अशी माहिती यावेळी दिली.(प्रतिनिधी)

एक महिन्यात पुढील पाच वर्षांची परवानगी मिळेल
नागपूर फ्लाईंग क्लबला नोव्हेंबर २०१५ पासून डीजीसीएच्या परवानगीसाठी प्रतीक्षा होती. नागपूर फ्लाईंग क्लबचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पायलट प्रशिक्षणासाठी परवानगी मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तसेच प्रशिक्षण परवानगीसाठी पाठपुरावा केल्यामुळे उड्डाण प्रशिक्षणाला परवानगी मिळाली आहे. दोन तांत्रिक अधिकारी व एक सहायक यांची येत्या १५ दिवसात नियुक्ती केल्यानंतर येत्या एक महिन्याच्या आत पुढील पाच वर्षासाठी परवानगी मिळेल, असा विश्वास विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केला.

 

Web Title: Fleet will take the flying club of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.