नागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 10:00 PM2018-10-09T22:00:38+5:302018-10-09T22:01:29+5:30

नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे भरधाव जात असलेली एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले.

Five casualties were reported on Umred road accident in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

नागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावर भीषण अपघात, पाच ठार

Next
ठळक मुद्देट्रॅव्हल्स ट्रकवर धडकली : उदासा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड ) : नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे भरधाव जात असलेली एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले.
जखमींमध्ये तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

Web Title: Five casualties were reported on Umred road accident in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.