नागपुरातील कामठी रोडवर भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:09 AM2019-06-02T01:09:10+5:302019-06-02T01:11:08+5:30

कामठी रोडवरील मोहम्मद अली पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पियो कारच्या धडकेत एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. अभिमन्यू डोरले असे जखमीचे नाव आहे. ते आजनी ग्राम पंचायतचे सचिव राहुल डोरले यांचे वडील असल्याचे सांगितले जाते. हा अपघात शनिवारी रात्री ८.३० वाजता घडला.

Fatal accidents on the Kamathi road in Nagpur | नागपुरातील कामठी रोडवर भीषण अपघात

नागपुरातील कामठी रोडवर भीषण अपघात

Next
ठळक मुद्देस्कॉर्पियोची दुचाकीला जोरदार धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवरील मोहम्मद अली पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पियो कारच्या धडकेत एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. अभिमन्यू डोरले असे जखमीचे नाव आहे. ते आजनी ग्राम पंचायतचे सचिव राहुल डोरले यांचे वडील असल्याचे सांगितले जाते. हा अपघात शनिवारी रात्री ८.३० वाजता घडला. 


प्रत्यक्षदर्शीनुसार एक स्कॉर्पियो गाडी कामठीकडून ऑटोमाबाईल चौकाकडे येत होती. त्याच्या समोरच दुचाकी वाहन एमएच ४० एएफ १८६१ वर डोरले जात होते. कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत पोलीस या अपघातीच पुष्टी करीत नव्हते.

Web Title: Fatal accidents on the Kamathi road in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात