शेतकरीच बनत आहेत शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत; राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:24 PM2017-12-22T21:24:48+5:302017-12-22T21:27:33+5:30

शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.

Farmers are the inspiration of farmers; National Farmers Day Special | शेतकरीच बनत आहेत शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत; राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष

शेतकरीच बनत आहेत शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत; राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष

Next
ठळक मुद्देशेतीतून दिला उद्योगाचा मंत्रदरवर्षी २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो

अंकिता देशकर
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीक्षेत्रात गेल्या काही वर्षात निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सावकारीचे ग्रहण, शेती मालाला न मिळणारे भाव, सरकारी धोरणं, शेतकऱ्यांवर होत असलेले राजकारण यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. विदर्भात तर शेतकऱ्यांच्या विदारक अवस्था बघून शेतकरी कुठेतरी कुजलेला, पिचलेला दिसतो आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त अशा काही प्रेरणादायी शेतकऱ्यांची यशोगाथेवर प्रकाश टाकला आहे. या शेतकऱ्यांनी शेतीतूनच दर्जेदार उत्पादन घेऊन, शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. हे शेतकरी आता परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान ठरत आहे.

शेतीचा खर्च कमी करणे हा उद्देश
रामटेक परिसरात हळदीची शेती करण्यामागे उमाकांत पोफळी अनेक शेतकऱ्यांना प्रेरीत केले आहेत. कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पोफळी यांनी शेतकऱ्यांसाठी अगदी कमी खर्चात हळदीचे पॉलिश यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे यंत्र उपयोगात आणले जाते. यात १५ ते २० मिनिटात १२० किलो हळद पॉलिश होते. लोकमतशी बोलताना पोफळी म्हणाले, शेतकºयांनी आत्महत्येचा विचार करू नये, असा विचार मनात आलाच तर थोडे तिर्थाटन करा आणि परत येऊन कामाला लागा. पोफळी हे सेंद्रीय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. त्यांना आयुर्वेदाचा भरपूर अनुभव आहे. ते सेंद्रीय खताची सुद्धा निर्मिती करतात.

मधमाशी पालनातून थाटला व्यवसाय
उमरेड तालुक्यातील शुद्धोधन रामटेके यांनी शेतीला जोड म्हणून मधमाशी पालन सुरू केले. आज मधमाशी पालन हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. २०१४ पासून त्यांनी शेतीबरोबर मधमाशीपालन सुरू केले. आज वर्षाला २०००० किलो मध गोळा करतात. त्यांनी स्वत:ची कंपनी तयार केली आहे. मधमाशी पालन करणाऱ्यांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणाबरोबरच त्यांना स्टायफंडही स्वत:कडून देतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या मधाची निर्मिती ही वेगवेगळ्या ‘फ्लेवर’ मध्ये आहे. ते पंजाब, हरियाणा, बिहार येथील शेतीतून मधाची निर्मिती करतात. मोठमोठ्या कंपन्यांना ते मधाचा पुरवठाही करतात.

 

 

Web Title: Farmers are the inspiration of farmers; National Farmers Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी