सलमानच्या शिक्षेत प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:10 AM2018-04-06T00:10:37+5:302018-04-06T00:10:47+5:30

दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक्षीच्या आधारावरच सलमान दोषी ठरला असेल, असे मत या प्रकरणाचे तत्कालीन वनअधिकारी ललित बोरा यांनी व्यक्त केले. सध्या खासगी कंपनीत कार्यरत असलेले ललित बोरा नागपुरात आले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.

Eye witness were important in Salman case | सलमानच्या शिक्षेत प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची

सलमानच्या शिक्षेत प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची

Next
ठळक मुद्देतत्कालीन तपास अधिकारी ललित बोरा : परिस्थितीजन्य पुरावे केले होते गोळा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक्षीच्या आधारावरच सलमान दोषी ठरला असेल, असे मत या प्रकरणाचे तत्कालीन वनअधिकारी ललित बोरा यांनी व्यक्त केले. सध्या खासगी कंपनीत कार्यरत असलेले ललित बोरा नागपुरात आले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या.
काळवीट शिकारप्रकरणी पुरावे गोळा करण्यात त्यावेळच्या तपास चमूची मौलिक भूमिका होती. आम्ही प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविली होती. शिवाय शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा ड्रायव्हर, त्याचा मालक यांची साक्षदेखील घेतली होती; सोबतच इतर परिस्थितीजन्य पुरावेदेखील गोळा करण्यात आले होते. या प्रकरणात रायफल, रिव्हॉल्व्हर, एअरगनदेखील जप्त करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांच्या आधारावर न्यायालयात प्रकरण उभे झाले होते. आम्ही तपास करून तो न्यायालयात सादर केला होता. त्यानंतर सरकारी पक्षानेदेखील सक्षमपणे युक्तिवाद केला. सलमान खान व इतर अभिनेत्यांवर दोषारोप होते. परंतु प्रत्यक्षदर्शींनी केवळ सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. इतरांनी केवळ त्याला उकसविले होते, असे ललित बोरा यांनी सांगितले.
बिष्णोई समाज पर्यावरणप्रेमी
काळवीट शिकारीचे प्रकरण लावून धरण्यात बिष्णोई समाजाची मोठी भूमिका होती. याबाबत ललित बोरा यांना विचारणा केली असता हा समाज काळवीटसोबत भावनात्मक व सामाजिकदृष्ट्या जुळला असल्याचे त्यांनी सांगितले. जर बिष्णोई समाजाची परंपरा व इतिहास पाहिला तर ते २९ आदर्शांचे पालन करतात. यात झाडे न तोडणे तसेच जनावरांची हत्या न करणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एखाद्या बछड्या काळविटाची आई मृत्यूमुखी पडली तर चक्क महिलांनी त्या बछड्याला स्तनपान केल्याचीदेखील उदाहरणे आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Eye witness were important in Salman case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.