नागपुरात नराधम पित्याकडून  पोटच्या मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:59 PM2018-04-13T15:59:51+5:302018-04-13T16:00:04+5:30

चाकूचा धाक दाखवून आणि त्याला जुमानत नसल्याचे पाहून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण करून एका आरोपीने पोटच्या मुलीवर (वय १७) पाशवी बलात्कार केला. ६ एप्रिलला घडलेल्या या घटनेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

Exploit the daughter by father in Nagpur | नागपुरात नराधम पित्याकडून  पोटच्या मुलीचे शोषण

नागपुरात नराधम पित्याकडून  पोटच्या मुलीचे शोषण

Next
ठळक मुद्देचाकूचा धाक : कंबरपट्ट्याने बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाकूचा धाक दाखवून आणि त्याला जुमानत नसल्याचे पाहून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण करून एका आरोपीने पोटच्या मुलीवर (वय १७) पाशवी बलात्कार केला. ६ एप्रिलला घडलेल्या या घटनेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
आरोपी ४५ वर्षांचा आहे. तो यशोधरानगरात राहतो. पीडित मुलीचे तो दीड वर्षांपासून शोषण करीत आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधून तो तिच्यावर अत्याचार करायचा. जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी गप्प होती. ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिला चाकूचा धाक दाखवला. त्यालाही ती घाबरत नसल्याचे पाहून आरोपीने तिला कंबरपट्ट्याने बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचार आणि बेदम मारहाणीमुळे मुलीची शारीरिक आणि मानसिक अवस्था बिघडली. एका मैत्रिणीने तिला विचारणा केली तेव्हा तिच्या भावनांचा बांध फुटला. त्यानंतर या घटनेचा बोभाटा झाला. नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्याने ती यशोधरानगर ठाण्यात पोहचली. बुधवारी तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Exploit the daughter by father in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.