दीपक बजाजविरुद्ध ७ फेब्रुवारीपासून साक्षीदारांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:20 PM2019-01-08T23:20:23+5:302019-01-08T23:21:20+5:30

बेहिशेबी मालमत्ता बाळगणारा सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धच्या खटल्यात सरकार पक्षाने मंगळवारी सत्र न्यायालयामध्ये साक्षपुरावे नोंदविण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्ध साक्षीदार तपासण्यासाठी ७ फेब्रुवारी ही तारीख दिली.

Examination of witnesses against Deepak Bajaj from 7th February | दीपक बजाजविरुद्ध ७ फेब्रुवारीपासून साक्षीदारांची तपासणी

दीपक बजाजविरुद्ध ७ फेब्रुवारीपासून साक्षीदारांची तपासणी

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : सरकार पक्षाने सादर केला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेहिशेबी मालमत्ता बाळगणारा सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज व इतर आरोपींविरुद्धच्या खटल्यात सरकार पक्षाने मंगळवारी सत्र न्यायालयामध्ये साक्षपुरावे नोंदविण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्ध साक्षीदार तपासण्यासाठी ७ फेब्रुवारी ही तारीख दिली.
उच्च न्यायालयाने हा खटला येत्या सप्टेंबर-२०१९ पर्यंत निकाली काढण्याचा आदेश सत्र न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे हा खटला वेगाने चालणार आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा बजाजवर आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठमोठ्या देणग्या घेत होता तसेच शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात २६ सप्टेंबर २०१५ रोजी एफआयआर नोंदवून बजाज व इतर आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून बजाज कारागृहात आहे. त्याने वैद्यकीय व अन्य विविध कारणांवरून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. पण गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता कोणत्याही न्यायालयाने त्याला दिलासा दिला नाही. सध्या उच्च न्यायालयात त्याचा जामीन अर्ज प्रलंबित आहे. मधुमेह व अन्य विविध आजारांमुळे दीपक बजाजची प्रकृती दिवसेंदिवस अधिक खराब होत आहे. सरकारने उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, बजाज स्वत:वर औषधोपचार करण्यासाठी कारागृह प्रशासनाला सहकार्य करीत नाही. परिणामी, त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक खराब होत आहे.

Web Title: Examination of witnesses against Deepak Bajaj from 7th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.