"कंत्राटी कामगारांना संरक्षण देणारा कायदा करणार"

By कमलेश वानखेडे | Published: December 20, 2023 04:40 PM2023-12-20T16:40:53+5:302023-12-20T16:41:20+5:30

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची विधानसभेत घोषणा

Enact a law to protect contract workers says suresh khade | "कंत्राटी कामगारांना संरक्षण देणारा कायदा करणार"

"कंत्राटी कामगारांना संरक्षण देणारा कायदा करणार"

नागपूर : कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावे, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितले. कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणेच सक्षम कारणाशिवाय कामावरून कमी करू नये, तसेच कामावरून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जावी आदी बाबींसंदर्भात संरक्षण देणारे विधेयक आणून कायदा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. आ. प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

 आ. बच्चू कडू यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावर उत्तप देताना कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, कंत्राटी कामगार हा कायमस्वरूपी नसल्याने त्याला आवश्यकतेनुसार कामावरून काढता येऊ शकते. तथापि त्यासाठी सक्षम कारण असणे आवश्यक आहे. अशा कामगारांना कामावरून कमी करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याबाबत संबंधित कंपन्यांना सूचित केले जाईल. कामगारांना भविष्य निर्वाह निधी दिला आहे किंवा नाही याची शासनामार्फत पडताळणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Enact a law to protect contract workers says suresh khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.