वादळी पावसामुळे वीज मनोरा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:28 PM2018-06-13T23:28:43+5:302018-06-13T23:28:53+5:30

नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मनोरा कोसळताना महावितरणच्या वाहिनीवर कोसळल्याने महावितरणची वाहिनीही मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे, झालेल्या या हानीची पाहणी करून वितरण यंत्रणा त्वरित उभी करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिल्या आहेत.

Electricity tower collapsed due to Windy rain | वादळी पावसामुळे वीज मनोरा कोसळला

वादळी पावसामुळे वीज मनोरा कोसळला

Next
ठळक मुद्देमहावितरण प्रादेशिक संचालकांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मनोरा कोसळताना महावितरणच्या वाहिनीवर कोसळल्याने महावितरणची वाहिनीही मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे, झालेल्या या हानीची पाहणी करून वितरण यंत्रणा त्वरित उभी करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिल्या आहेत.
रिठी-पारडी येथील घटनास्थळी भालचंद्र्र खंडाईत यांनी भेट देत एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला, यावेळी त्यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अदानीचे उपमहाव्यवस्थापक रामकृष्ण राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक अमरनाथ आणि ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते. हा अजस्त्र उच्चदाब मनोरा महावितरणच्या वाहिनीवर कोसळून कृषीपंपासाठीच्या लघुदाब वाहिनीचे तब्बल २० खांब क्षतिग्रस्त झाल्याने वीज वितरण सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत, त्यांचे तात्काळ निराकरण करून वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी महावितरण आणि अदानीच्या सर्व संबंधितांना यावेळी दिल्या. ही लघुदाब वीजवाहिनी त्वरित उभारून कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

Web Title: Electricity tower collapsed due to Windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.