देशपांडे सभागृहासह एमएलए होस्टेलची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:10 AM2019-03-31T01:10:57+5:302019-03-31T01:12:57+5:30

शहरातील एमएलए होस्टेल आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहावर असलेल्या १० लाख रुपये थकीत वीज बिलासंदर्भात शनिवारी दुपारी कारवाई करीत एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी येथील वीज कनेक्शन कापले. परंतु कनेक्शन कापताच येथे खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निवडणुकीचे कारण सांगू लागले. थकीत बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या विभागाने आता या कारवाईला निवडणुकीच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचे सांगत याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वृत्त लिहिस्तोवर अशी कुठलीही तक्रार दाखल झालेली नव्हती.

The electricity of MLA Hostel with Deshpande Hall was cut | देशपांडे सभागृहासह एमएलए होस्टेलची वीज कापली

देशपांडे सभागृहासह एमएलए होस्टेलची वीज कापली

googlenewsNext
ठळक मुद्दे१० लाख रुपये होते थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील एमएलए होस्टेल आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहावर असलेल्या १० लाख रुपये थकीत वीज बिलासंदर्भात शनिवारी दुपारी कारवाई करीत एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी येथील वीज कनेक्शन कापले. परंतु कनेक्शन कापताच येथे खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निवडणुकीचे कारण सांगू लागले. थकीत बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या विभागाने आता या कारवाईला निवडणुकीच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचे सांगत याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वृत्त लिहिस्तोवर अशी कुठलीही तक्रार दाखल झालेली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएलए होस्टेलवर ६.३७ लाख रुपये आणि वसंतराव देशपांडे सभागृहावर ३.६६ लाख रुपयचे वीज बिल थकीत आहे. १५ मार्च शेवटची तारीख असल्याने एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. १८ मार्चपर्यंत वीज बिल न भरल्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात आली; सोबतच १० दिवसात बिल न भरल्यास कनेक्शन कापण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यानंतरही शनिवारी दुपारपर्यंत बिल भरले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन्ही ठिकाणचे कनेक्शन कापले.

Web Title: The electricity of MLA Hostel with Deshpande Hall was cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.