रात्रीच्या वेळी जंगलात ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी : ती वाघिण कुठे झाली गायब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:19 PM2018-10-11T22:19:08+5:302018-10-11T22:21:13+5:30

राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तैनात करण्यात आले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. यानंतर शोध अभियानात व्हेटरनरी डॉक्टर, सहा शॉर्प शूटरसह २० पोलीस कर्मचाऱ्यांची एक चमू आणि वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल २०० लोकांची टीम वाघिण टी-१ च्या शोधात तैनात आहे.

During the night dron camera inspected in the forest: Where did the Tigress disappear? | रात्रीच्या वेळी जंगलात ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी : ती वाघिण कुठे झाली गायब ?

रात्रीच्या वेळी जंगलात ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी : ती वाघिण कुठे झाली गायब ?

Next
ठळक मुद्देपॉवर पॅराग्लेडर, ६ शॉर्प शूटरसह नवाब अलीही शोधमोहिमेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तैनात करण्यात आले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. यानंतर शोध अभियानात व्हेटरनरी डॉक्टर, सहा शॉर्प शूटरसह २० पोलीस कर्मचाऱ्यांची एक चमू आणि वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल २०० लोकांची टीम वाघिण टी-१ च्या शोधात तैनात आहे.
सोमवारी रात्री जंगलात ड्रोन कॅमेरा फिरवून वाघिणीला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती ड्रोनमध्येही आढळून आली नाही. आता वाघिण शोधण्यासाठी दोन प्रशिक्षित केन कोरसो श्वान त्यांचे प्रशिक्षक ज्योती रंधावा यांच्यासह राळेगावात पोहोचले आहे. यापूर्वी वनक्षेत्रात ८८ कॅमेरा ट्रॅप आणि ५२ प्रेशर इम्प्रेशर पॅड लावण्यात आलेले आहे. परंतु वाघिण टी-१ चा कुठलाही पत्ता लागू शकला नाही. शूटर नवाब अली व टीमने मंगळवारी रात्री वाघिणीला शोधण्यासाठी नाईट गस्तही केली. सकाळपासून स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची कोर टीम बॅकअप देण्याचे काम करीत आहे. बुधवारी पॉवर पॅराग्लायडरही राळेगावला पोहाचले. त्याचीही ट्रायल घेण्यात आली.

शोधमोहिम सलग सुरू
राळेगाव येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा हे स्वत: ठाण मांडून आहेत. त्यांनी सांगितले की, वाघिण टी-१ ला शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. आता ड्रोन कॅमेऱ्यासोबतच पॅराग्लायडर आणि विशेष प्रशिक्षित श्वानांचीही मदत घेतली जात आहे.

वाघिणीचा मृत्यू होऊ नये याची काळजी घ्या
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) नागपूर कार्यालयाचे एआयजी हेमंत कामडी यांनी सांगितले की, चीफ वाईल्ड लाईन वॉर्डन (पीसीीसीएफ) यांना दिल्ली मुख्यालयावरून वाघिण टी-१ ला ट्रॅक्युलाईज करण्यादरम्यान एनटीसीएच्या एसओपी आणि गाईडलाईनचे पालन करण्याबाबत पत्र जारी करण्यात आले आहे. वाघिणीला प्राथमिकतेने ट्रॅक्युलाईज करण्यासोबतच कुठल्याही परिस्थितीत नियमंचे उल्लंघन न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वाघिण मरू नये, याची काळजी घेण्याबाबत ताकीदही देण्यात आली आहे.

Web Title: During the night dron camera inspected in the forest: Where did the Tigress disappear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.