नागपुरात डिझेल, पेट्रोल चोरीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:37 PM2019-03-30T22:37:47+5:302019-03-30T22:48:06+5:30

टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची कुणकुण लागताच सर्व आरोपी तेथून पळून गेले. या कारवाईमुळे तेलमाफियांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे खापरीतील डिझेल-पेट्रोल चोरी करणाऱ्यांची टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Diesel , petrol stolen case bust in Nagpur | नागपुरात डिझेल, पेट्रोल चोरीचा पर्दाफाश

नागपुरात डिझेल, पेट्रोल चोरीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देडिझेलचे दोन टँकर, खुले डिझेल-पेट्रोल जप्त : आरोपी पळालेगुन्हे शाखेची खापरीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टँकरमधून डिझेल,पेट्रोलचीचोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची कुणकुण लागताच सर्व आरोपी तेथून पळून गेले. या कारवाईमुळे तेलमाफियांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे खापरीतील डिझेल-पेट्रोल चोरी करणाऱ्यांची टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
खापरी, डोंगरगाव, बुटीबोरी, हिंगणा परिसरात डिझेल,पेट्रोल,रॉकेल आणि काळे ऑईल चोरून त्याची काळाबाजारात विक्री करण्याचा गोरखधंदा गेल्या १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. खापरी डेपोतून डिझेल,पेट्रोलचे टँकर घेऊन बाहेर पडणाऱ्या टँकर चालकासोबत संगनमत करून आणि नाही ऐकल्यास वाहनचालकाला शस्त्राच्या धाकावर बाजूच्या जंगलात नेले जाते. तेथे टँकरमधून डिझेल, पेट्रोल ड्रम, टाक्या आणि कॅन(डबक्या)मध्ये काढून त्याची नंतर वाहनचालकांना विक्री केली जाते. वर्षांनुवर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यात तेलमाफियांसह अनेक गुन्हेगार सहभागी आहेत. अधूनमधून पोलीस कारवाई करतात. त्यानंतरचे काही दिवस हा गोरखधंदा बंद होतो. पुन्हा काही दिवसांनी तेलमाफिया गुन्हेगारांच्या साथीने हा धंदा सुरू करतात. त्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यांनी लगेच युनिट चारच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास खापरीतील महेश ढाब्याजवळच्या प्यारेभाई गॅरेजजवळ पोलिसांचा मोठा ताफा पोहचला. बाजूच्या खुल्या जागेत दोन डिझेलचे टँकर उभे होते. त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल तर दुसºया टँकरमधून पेट्रोल काढून डबक्यांमध्ये ठेवले होते. आणखी डिझेल काढण्याची तयारी सुरू होती. मात्र, पोलिसांचा मोठा ताफा आल्याचे पाहून सर्वच्यासर्व आरोपी वाट मिळेल त्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, एकही आरोपी पोलिसांच्या हातात आला नाही.
दरम्यान, पोलिसांनी तेथून एमएच २८/बी ८१५५ क्रमांकाच्या टँकरमधून सुमारे ३८ लाख १६ हजारांचे १२ हजार लिटर डिझेल, एमएच ३१/ डीएस ०२७९ क्रमांकाच्या टँकरमधून १० हजार लिटर डिझेल आणि डबक्यात भरून असलेले २०० लिटर डिझेल तसेच २० लिटर पेट्रोल, असे एकूण ७५ लाख ११,२०० रुपयांचे डिझेल,पेट्रोल जप्त केले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या नेतृत्वात युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षाची तक्रार
या प्रकरणात विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित रमेशचंद्र गुप्ता यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टँकरच्या मालक, चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून या गोरखधंद्यात गुंतलेल्या तेलमाफियांची नावे पुढे येऊ शकतात.

 

Web Title: Diesel , petrol stolen case bust in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.