सीआरएफमधून विकास; प्रकल्पासाठी १८८२ कोटींचा निधी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:07 PM2019-01-15T22:07:47+5:302019-01-15T22:09:28+5:30

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात केंद्रीय मार्ग निधी(सीआरएफ)मधून २० विकास प्रकल्प होत आहेत. यासाठी १८८२ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ११ प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या असून नऊ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले.

Development from CRF; Rs 1882 crore fund for the project: Nitin Gadkari | सीआरएफमधून विकास; प्रकल्पासाठी १८८२ कोटींचा निधी : नितीन गडकरी

सीआरएफमधून विकास; प्रकल्पासाठी १८८२ कोटींचा निधी : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देप्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात केंद्रीय मार्ग निधी(सीआरएफ)मधून २० विकास प्रकल्प होत आहेत. यासाठी १८८२ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ११ प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या असून नऊ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले.
महाल येथील महापालिकेच्या टाऊ न हॉलमध्ये आयोजित बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्रािधकरण, महापालिका, नासुप्र, मेट्रो रेल्वे, महसूल विभागासह अन्य विभागांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार,आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, विभागीय आयुक्त संजीव कुमार,जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आठवडाभरात जमीन अधिग्रहण व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार कामाला गती द्या, महाल येथील बुधवार बाजाराच्या निविदा सात दिवसात काढा, तसेच सक्करदरा येथील बुधवार बाजाराचा आराखडा सात दिवसात सादर करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले.
यशवंत स्टेडियमच्या जागेवर नवीन अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यात परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शोध व प्रशिक्षण संस्था यासह अन्य प्रकल्पांची फाईल मंजुरीसाठी राज्य सरकाकडे पाठविली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी नासुप्र, टिळक पत्रकार भवन, एसआरए, महापालिका व लायब्ररी यांची संयुक्त बैठक घेऊ न जागा अधिग्रहित करण्याची सूचना गडकरी यांनी केली. टेकडी मंदिर उड्डाणपूल पाडून येथील परिसराचा विकास केला जाणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाची दीड एकर जागा घेतली जाणार आहे. या मोबदल्यात संरक्षण मंत्रालयाला अहमदनगर येथील जागा उपलब्ध करण्यात येईल. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांनी पुनर्वसनासाठी सहमती दर्शविली आहे. मेट्रो रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकु लात त्यांना जागा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
उपलब्ध निधीतून विकास कामे
पारडी उड्डाणपूल, इंदोरा ते अशोक चौकपर्यंत उड्डाणपूल, दिघोरी ते नागपूर शहराच्या सीमेपर्यंत रस्त्यांचे निर्माण, रिझर्व बँक चौक ते गड्डीगोदाम ते टेका नाकापर्यंत उड्डाणपूल व अंडरपास, जुना भंडारा रोड, केळीबाग रोड, गणेश टेकडी मार्ग, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट नव्याने विकसित करणार आहे.
बाधितांना लीजवर दुकाने
महाल येथील रस्ते विकासामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांना ३० वर्षांच्या लीजवर भाड्याने दुकाने उपलब्ध करण्यात येतील. महाल येथे उभारण्यात येणाऱ्या बुधवार बाजारात जागा दिली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे.

 

Web Title: Development from CRF; Rs 1882 crore fund for the project: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.