नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधींच्या व्याजाचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:07 AM2017-11-02T11:07:15+5:302017-11-02T11:11:52+5:30

नागपूर महापालिकेने र्बॅक आॅफ महाराष्ट्रकडून ३१ मार्च २०१० ला २०० कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जावरील व्याजाची वसुली ९.५० व १० टक्के दराने करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसला आहे.

Crores of interest in Nagpur Municipal Corporation | नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधींच्या व्याजाचा घोळ

नागपूर महानगरपालिकेत कोट्यवधींच्या व्याजाचा घोळ

Next
ठळक मुद्दे२०० कोटींचे कर्ज व्याजदर ८.५० वरून केला ९.५० टक्केसदस्यांची चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत नागपूर शहरात वाढीव पाणीपुरवठा योजना पेंच -१ व पेंच -४ टप्पा व अन्य प्रकल्पांचा आर्थिक वाटा उचलण्यासाठी महापालिकेने र्बॅक आॅफ महाराष्ट्र यांच्याकडून ३१ मार्च २०१० ला २०० कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा व्याजाचा दर ८.५० टक्के ठरला होता. याबाबत महापालिका व बँक व्यवस्थापन यांच्यात करार करण्यात आला होता. मात्र कर्जावरील व्याजाची वसुली ९.५० व १० टक्के दराने करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसला आहे. या आर्थिक घोळाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. महापालिकेने आजवर २१२ कोटी ९६ लाख १५ हजार ३५२ रुपयांंची परतफेड केली आहे. अजूनही महापालिकेकडे ३३ कोटी ७३ लाख ३ हजार ४८४ रुपयांचे कर्ज शिल्लक आहे. व्याजासहीत ही रक्कम ५० कोटीवर जाणार आहे. म्हणजे महापालिकेला ६२ कोटीहून अधिक रक्कम व्याजापोटी द्यावी लागणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी याबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. परंतु गोंधळामुळे यावर चर्चा झाली नव्हती. करारच्या तुलनेत व्याजदर एक टक्का वाढविण्यात आल्याने महापालिकेला कोट्यवधीचा फटका बसला आहे. लेखापरीक्षकांनी यावर आक्षेप नोंदविला असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संदीप सहारे यांनी महापौर व आयुक्तांकडे केली आहे.

लेखापरीक्षकांचा आक्षेप
लेखापरीक्षकांनी २०१७ च्या लेखापरीक्षणात यावर आक्षेप नोंदविला आहे. कराराच्या तुलनेत अधिक व्याज देण्यात आल्याने महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संदीप सहारे यांनी केली आहे.
सभागृहात चर्चा टळली
महापालिके च्या सर्वसाधारण सभेत गेल्या महिन्यात याबाबतचा प्रश्न सहारे यांनी चर्चेसाठी दिला होता. अजेंड्यावर हा विषय घेण्यात आला होता. परंतु बसपा नगरसेवकांनी गोधळ घातल्याचे कारण पुढे करून महापौरांनी सभा गुंडाळल्याने या विषयावरील चर्चा टळली. परंतु प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरात महापालिकेने आजवर व्याजापोटी २१२ कोटी ९६ लाख १५ हजार ३५२ रुपयांची परतफेड केल्याची माहिती दिली आहे. व्याजदराची चौकशी झाल्यास यात अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Crores of interest in Nagpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.