धर्मांतरण म्हणजे देशावरील हल्लाच : तरुण विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:02 AM2019-01-30T01:02:44+5:302019-01-30T01:05:04+5:30

एका नियोजित षङ्यंत्रातून भारतावर सातत्याने आघात करण्यात येत आहेत. देशाच्या मूळ चेतनेला ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताच्या अहिंदूकरणाचे षङ्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांतरणाचे प्रमाण पाहता हा देशावरील एक हल्लाच आहे, असे मत माजी खासदार तरुण विजय यांनी व्यक्त केले. प्रो.राजेंद्र सिंह स्मृती संस्थेतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक रज्जू भय्या यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक परिवर्तन आणि भविष्याचा भारत’ या विषयावरील व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.

Conversion is the attack on the country: Tarun Vijay | धर्मांतरण म्हणजे देशावरील हल्लाच : तरुण विजय

धर्मांतरण म्हणजे देशावरील हल्लाच : तरुण विजय

Next
ठळक मुद्देरज्जूभय्या यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका नियोजित षङ्यंत्रातून भारतावर सातत्याने आघात करण्यात येत आहेत. देशाच्या मूळ चेतनेला ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताच्या अहिंदूकरणाचे षङ्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांतरणाचे प्रमाण पाहता हा देशावरील एक हल्लाच आहे, असे मत माजी खासदार तरुण विजय यांनी व्यक्त केले. प्रो.राजेंद्र सिंह स्मृती संस्थेतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक रज्जू भय्या यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक परिवर्तन आणि भविष्याचा भारत’ या विषयावरील व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.
‘आयटी पार्क’ येथील ‘पर्सिस्टंट’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य, ‘आनंद ही आनंद’चे संस्थापक विवेक जी. ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशाचा इतिहास गौरवशाली होता. मात्र भविष्याबाबत आताच चिंतन करणे आवश्यक आहे. देशाच्या सीमेवरील जनजातींचे संवर्धन झाले पाहिजे. शिवाय दैनंदिन जीवनातून अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. भारतीयत्वाच्या विरोधात काम करणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन तरुण विजय यांनी केले. यावेळी राजेंद्र सिंह स्मृती संस्थेच्या अध्यक्षा आभा सिंह, वरिष्ठ उपाध्यक्षा छाया गाडे, सचिव अजय सिंह, कोषाध्यक्ष आलोक सिंह, उपाध्यक्ष धर्मवीर सिंह उपस्थित होते. अजय कुमार सिंह यांनी संचालन केले तर सोनल सिंहने आभार मानले.
तीन सरसंघचालकांच्या निवडीसाठी घेतला माझा सल्ला
यावेळी मा.गो.वैद्य यांनी सरसंघचालकांच्या निवड प्रक्रियेबाबतच्या आठवणी सांगितल्या. संघाच्या घटनेनुसार सरसंघचालकांसाठी निवडणूक घेतली जात नाही़ विशेष लोकांचा सल्ला घेऊन सरसंघचालकच आपल्या हयातीत पुढच्या सरसंघचालकांची निवड करत असतात़ आतापर्यंत तीन सरसंघचालकांच्या निवडीसाठी माझादेखील सल्ला घेण्यात आला. विशेष म्हणजे मी सुचविलेल्या तीनही पदाधिकाºयांची सरसंघचालकपदी निवड झाली, असे वैद्य यांनी सांगितले.
---तर रज्जू भय्या वैज्ञानिक झाले असते : गडकरी
रज्जू भय्या हे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. अणुऊर्जा वैज्ञानिक म्हणून काम करीत असताना होमी जहांगीर भाभा यांनी त्यांना देशाच्या परमाणू मोहिमेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. मात्र रज्जू भय्या यांनी संघकार्याला प्राधान्य दिले. देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकला असे भाभा म्हणायचे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. रज्जू भय्या यांचे जीवन प्रेरणादायी होते. ते देश आणि समाजाला समर्पित व्यक्तिमत्त्व होते आणि अखेरपर्यंत राष्ट्र पुनर्निर्माणाचाच विचार त्यांच्या मनात होते, असे गडकरी यावेळी म्हणाले़

 

Web Title: Conversion is the attack on the country: Tarun Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.