अधिवेशन कडू झाले तरी तुम्ही तोंड गोड करा; यशोमती ठाकूर यांनी वाटले चॉकलेट

By मंगेश व्यवहारे | Published: December 20, 2023 04:23 PM2023-12-20T16:23:20+5:302023-12-20T16:23:37+5:30

सरकार नागपुरात मुक्कामी येऊनही विदर्भाचे प्रश्न सोडवू शकले नाही, अशी टीका ठाकूर यांनी केली.

congress mla Yashomati Thakur felt distribute chocolate | अधिवेशन कडू झाले तरी तुम्ही तोंड गोड करा; यशोमती ठाकूर यांनी वाटले चॉकलेट

अधिवेशन कडू झाले तरी तुम्ही तोंड गोड करा; यशोमती ठाकूर यांनी वाटले चॉकलेट

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवशनाचे आज सुप वाजत आहे. गेले १५ दिवस अख्खे सरकार अधिवेशनासाठी नागपुरात तळ ठोकून असतानाही सामान्यांच्या जगण्यामरण्याशी निगडीत एकही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे अधिवेशनाचा शेवट कडू झाला असला तरी तुम्ही तोंड गोड करा, असा उपरोधीत टोला  लगावत अमरावती येथील आमदार यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत विधानभवन परिसरात सर्वांना चॉकलेट वाटले. 

अधिवेशनाचे फलित मात्र शून्य असल्याची टीका करीत ठाकूर म्हणाल्या, सरकार नागपुरात मुक्कामी येऊनही विदर्भाचे प्रश्न सोडवू शकले नाही. सामान्यांची निराशा करणारे हे अधिवेशन गुरुवारी संपल्यानंतर सरकार पुन्हा  आपापल्या गावी रवाना होईल. त्यामुळे अधिवेशनाचा शेवट कडू झाला असला तरी तुम्ही तोंड गोड करा, असा टोला लगावत त्या सभागृहात निघून गेल्या.

Web Title: congress mla Yashomati Thakur felt distribute chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.