नागपुरात सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्याला ६८ लाखाने फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:06 PM2018-09-12T22:06:50+5:302018-09-12T22:09:11+5:30

वित्त मंत्रालय दिल्ली येथील अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी एका सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्यास ६८ लाख रुपयाचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Cheated retired Income Tax officer by Rs 68 lakh in Nagpur | नागपुरात सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्याला ६८ लाखाने फसवले

नागपुरात सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्याला ६८ लाखाने फसवले

Next
ठळक मुद्देपेन्शन फंड मिळवून देण्याचे दाखवले आमिष : आरोपींनी स्वत:ला वित्त मंत्रालयाचे अधिकारी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वित्त मंत्रालय दिल्ली येथील अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी एका सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्यास ६८ लाख रुपयाचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
माधव महादेवराव चिमूरकर (६९) रा. पूर्व वर्धमाननगर असे फिर्यादी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या वर्षी ४ फेब्रुवारी २०१७ रोजी चिमूरकर यांना मोबाईलवर आरोपीचा फोन आला. त्याने आपले नाव मनीष जैन असे सांगितले. तसेच तो वित्त मंत्रालय दिल्ली येथे अधिकारी असल्याचा परिचय दिला. आरोपीने फोनवर बोलताना चिमूरकर यांना सांगितले की, त्यांनी २०१४ पासून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रक्कम जमा केली आहे. त्यावर ९ लाख ८३ हजार ४३८ रुपये देण्यात येतील. तसेच केंद्रीय विशेष फंडमधून ४३ लाख ९२ हजार रुपये मिळणार असल्याचेही आमिष दाखवले. यानंतर आरोपी सोनिया बजाज, सुदेश साहू, अंजली ओबेरॉय, आर. के. कोठारी, उमेशचंद्र, अमित अरोरा नावाच्या बोगस अधिकाºयांनी चिमूरकर यांच्याशी संपर्क साधून शासकीय नियमानुसार पैसे रिलीज करण्यासाठी आवश्यक दस्तावेज प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. याप्रकारे लोकल एनओसी, स्टॅम्प पेपर, सर्वर चार्ज, लीगल सर्टिफिकेट, बँक सेक्युरिटी आदी दस्तावेज चार्जच्या नावावर हळूहळू बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. याप्रकारे चिमूरकर यांनी फेब्रुवारी २०१७ पासून २६ मार्च २०१८ पर्यंत ६८ लाख ४ हजार १९९ रुपये जमा केले. यानंतरही त्यांच्या खात्यात पेन्शन फंड किंवा इतर कुठलीही रक्कम जमा झाली नाही. आरोपींच्या मोबाईल नंबरवरही संपर्क होत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चिमूरकर यांनी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे लिखित तक्रार दाखल केली. सायबर सेलने चौकशीनंतर त्यांची फसवणूक झाल्याची पुष्टी होताच, हे प्रकरण लकडगंज पोलीस ठाण्यात रेफर केले. लकडगंजचे पीएसआय मसराम यांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Cheated retired Income Tax officer by Rs 68 lakh in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.