पाठलाग करीत प्रेयसीचा प्रियकराकडून भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:52 PM2018-03-17T22:52:49+5:302018-03-17T22:53:02+5:30

कार्यालयात कामावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला प्रियकराने मोटरसायकलने धक्का दिला. ती गाडीवरून खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने सात वार केले आणि लगेच पळून गेला. घटनेच्या वेळी तिच्यासोबत दुचाकीवर तिची आईदेखील होती. परिसरातील तरुणांनी तिला लगेच कामठी येथील खासगी रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहोली येथील बसस्टॅण्डजवळ शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

By chasing a boyfriend stabbed to death his girlfriend | पाठलाग करीत प्रेयसीचा प्रियकराकडून भोसकून खून

पाठलाग करीत प्रेयसीचा प्रियकराकडून भोसकून खून

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील साहोली बसस्थानकाजवळील थरारचाकूने केले सात वार : आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार्यालयात कामावर जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला प्रियकराने मोटरसायकलने धक्का दिला. ती गाडीवरून खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने सात वार केले आणि लगेच पळून गेला. घटनेच्या वेळी तिच्यासोबत दुचाकीवर तिची आईदेखील होती. परिसरातील तरुणांनी तिला लगेच कामठी येथील खासगी रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहोली येथील बसस्टॅण्डजवळ शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे साहोली येथे खळबळ उडाली आहे.
रत्नमाला राजकुमार ऊर्फ बाबाराव रांगणकर (२२, रा. सिंगोरी, ता. पारशिवनी) असे मृत तरुणीचे तर मंगल ऊर्फ साजन भीमराव बागडे (२४, रा. साहोली, ता. पारशिवनी) असे अटकेतील आरोपी प्रियकराचे नाव आहे. राजकुमार रांगणकर यांची सिंगोरी शिवारातील शेती वकोलि प्रशासनाने कोळसा खाणीसाठी अधिग्रहित केल्याने प्रकल्पग्रस्त कोट्यातून रत्नमालाला ती पदवीधर असल्याने वेकोलिच्या चंद्रपूर कार्यालयात सात महिन्यांपूर्वी नोकरी मिळाली होती. मात्र, तिने लगेच चनकापूर (भानेगाव-सिंगोरी) सब एरिया कार्यालयात बदली करवून घेतली होती. राजकुमार यांना तीन मुली असून, रत्नमाला ही सर्वात मोठी मुलगी होय.
रत्नमाला व मंगलची आधीची ओळख असून, त्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. मंगलने तिच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. मुलीला नोकरी मिळाल्याने राजकुमार यांनी मिलन चौक, चनकापूर (ता. सावनेर) येथे जागा खरेदी करून घराचे बांधकाम सुरू केले होते. ती आईला रोज दुचाकीने मिलन चौकात सोडायची आणि नंतर कार्यालयात जायची. सायंकाळी आईला घेऊन गावाला परत जायची.
मंगल ट्रकचालक म्हणून नोकरी करायचा. या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत घरच्या मंडळींना माहिती होती. मात्र, त्यांच्या लग्नाला घरच्या मंडळींचा विरोध होता. दरम्यान, ती शनिवारी सकाळी एमएच-४०/एझेड-००२५ क्रमांकाच्या दुचाकीने आईसोबत चनकापूरला जात होती. दरम्यान, मंगलने साहोली येथील बसस्टॉपजवळ तिच्या दुचाकीला मोटरसायकलने धक्का दिला. ती खाली कोसळताच त्याने तिच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. सात वार केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याने मोटरसायकलने खापरखेड्याच्या दिशेने पळ काढला. परिसरातील तरुणांनी तिला लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारादरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
छेडखानीची तक्रार
२६ फेब्रुवारी रोजी मंगलने रत्नमालाला मदत केली होती. याबाबत तिच्या आईवडिलांना माहिती मिळाली होती. सायंकाळी ती आईसोबत खापरखेडा पोलीस ठाण्यात गेली आणि तिने मंगलच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. मंगल रस्त्यात छेडखानी करतो, लग्नासाठी दबाव टाकतो, असेही तक्रारीत नमूद केले होते. बदनामी होऊ नये म्हणून दोघांमध्ये आपसी समझोताही झाला होता.
मंगलला मारहाण
मंगल शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सिंगोरी येथे गेला होता. त्यावेळी त्याला गावातील मुख्य चौकात सहा तरुणांनी बेदम मारहाण केली होती. मारहाण करणारे तरुण भानेगाव, सिंगोरी व गड्डीगोदाम (नागपूर) येथील होते. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला होता; शिवाय एकाने ‘तुझी तीन लाख रुपयांत सुपारी घेतली’ असल्याची बतावणी केली होती. त्यावेळी मंगल स्वत:चा जीव वाचवून पळून गेला व त्याने ही हकीकत त्याच्या भानेगाव येथील मित्राला सांगितली. पोलिसांनी भानेगाव येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. गड्डीगोदाम येथे दोघे खुनाच्या आरोपात तुरुंगात होते. ते नुकतेच सुटून बाहेर आले आहेत.
मारहाणीचा वचपा
शुक्रवारी केलेल्या मारहाणीचा वचपा घेण्यासाठी मंगलने रत्नमालाचा खून करण्याची योजना आखली. तो शनिवारी सकाळपासूनच तिच्या मागावर होता. ती आईसोबत साहोली येथे पोहोचताच दुचाकीला धक्का देऊन तिला खाली पाडले आणि चाकूने तिच्या पाठीवर पाच व पोटावर दोन असे सात वार केले. दरम्यान, आईने आरडाओरड करताच परिसरातील तरुण तिच्या मदतीला धावले.
घटनेची पुनरावृत्ती
एकतर्फी प्रेमातून प्रिया तुळशीराम रांगणकर (१८) या शालेय विद्यार्थिनीचा खून करण्यात आल्याची घटना तीन वर्षांपूर्वी खापरखेडा येथील प्रकाशनगर कॉलनीत घडली होती. विशेष म्हणजे, प्रिया ही सिंगोरी येथील तर, तिचा मारेकरी हर्षल खुशाल गुरडकर (२०) हा साहोली येथील रहिवासी होते. ती रत्नमालाची चुलत बहीण होय. प्रियाच्या हत्येनंतर हर्षलने सोनखांब (ता. काटोल) शिवारात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. रत्नमाला व प्रिया यांनी खापरखेडा येथील शाळेत शिक्षण घेतले आहे.
मोटरसायकल जप्त
खून केल्यानंतर मंगल एमएच-४०/एबी-६०९८ क्रमांकाच्या मोटरसायकलने खापरखेडामार्गे धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथे पळून गेला. दिवसभर तिथे थांबल्यानंतर तो सायंकाळी पाटणसावंगी - खापामार्गे पारशिवनीला जाण्यास निघाला होता. दुसरीकडे, स्थानिक गुन्हे शाखा, पारशिवनी व खापरखेडा पोलीस त्याचा शोध घेत होते. तो पाटणसावंगी परिसरात असल्याचे कळताच स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिसांनी त्याला पाटणसावंगी - खापा मार्गावर शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास अटक करून त्याच्याकडून मोटरसायकल जप्त केली. रत्नमालाने लग्नाला दिलेला नकार आणि सहा तरुणांनी शुक्रवारी केलेली जबर मारहाण यामुळे तिचा खून केल्याने त्याने पोलिसांना सांगितले. शिवाय, त्याने मारहाण करणाऱ्या  सहाही तरुणांची नावे सांगितली.

Web Title: By chasing a boyfriend stabbed to death his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.