बंदिजन शेतकºयांनाही मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:46 AM2017-09-15T00:46:22+5:302017-09-15T00:46:40+5:30

मध्यवर्ती कारागृहातील शेतकरी असलेल्या बंदिजनांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी केलेल्या ....

Barring farmers will get debt relief | बंदिजन शेतकºयांनाही मिळणार कर्जमाफी

बंदिजन शेतकºयांनाही मिळणार कर्जमाफी

Next
ठळक मुद्दे१४ आॅनलाईन अर्ज : मध्यवर्ती कारागृहात जिल्हा प्रशासनातर्फे विशेष सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील शेतकरी असलेल्या बंदिजनांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी केलेल्या विनंतीनुसार जेल प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून तसेच जिल्हा प्रशासनाने १४ बंदिजनांचे कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज भरुन घेतले आहेत. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग बंदिजनांनाही सुलभ झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला असून या योजनेच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांनी मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ते गजनान इंगळे यांच्या साहाय्याने कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या बंदिजनांकडून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आधारकार्डासह इतर माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून गोळा करण्यात आली.
कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी मध्यवर्ती कारागृहातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील बंदिजनांनी विनंती केली होती. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते गजानन इंगळे यांनी आधारकार्ड, तसेच इतर कागदपत्र गोळा करण्यासाठी बंदिजन व त्यांच्या नातेवाईकांकडे कारागृहाच्या वतीने संपर्क केला. त्यापैकी आधारकार्ड वरील बॉयोमेट्रिक नोंदणीनुसार पुष्टी करताना विसंगती तसेच काही बंदिजनांकडे आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध झाले नाहीत. त्यापैकी १४ जणांचे आधार क्रमांकासह आॅनलाईन नोंदणीसाठी पात्रता योग्य असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात आली.
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कृषी कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असता जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तहसीलदार तसेच आपले सरकार सेवाकेंद्राच्या चमूला मध्यवर्ती कारागृहामध्ये आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक बॉयोमेट्रिक यंत्रासह कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या बंदिजनांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. कर्जमाफीच्या नोंदणीनंतर युजर आयडी व पासवर्ड तयार झाल्यामुळे बंदिजनांच्या कुटुंबांनी आता त्यांच्या गावातील संग्राम केंद्रात अथवा आपले सरकार सेवाकेंद्रात जाऊन आॅनलाईन फार्म भरणे सुलभ झाले आहे.
कर्जमाफीसाठी मिळण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे बंदिजनांच्या कुटुंबांना त्यांच्या गावातील नोंदणी केंद्रामध्ये जाऊन कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठीसुध्दा मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपले सरकार या सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक उमेश घुगुसकर, आनंद पटले यांनी आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था केली. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता गजानन इंगळे यांनी कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या सर्व कैद्यांना भेटून त्यांचेकडून आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासोबतच आधार नंबर घेण्यासाठी संबंधित बंदिजनांच्या गावी संपर्क करुन आधार क्रमांक मिळविले.
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक सुनील निघोट, वरिष्ठ तुरुंग अधिकारी गावित, मिराशे, पाटील गुरुजी, हतवादे गुरुजी तसेच सामाजिक कार्यकर्ता गजानान इंगळे यांनी विशेष सहकार्य केले.
मध्यवर्ती कारागृह व जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकाराने शेतकरी कर्जमाफी योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही. या शासनाच्या भूमिकेनुसार बंदिजन असलेल्या शेतकºयांनाही कर्जमाफी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Web Title: Barring farmers will get debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.