तेलगीच्या सापळ्यात अडकला ‘बाहुबली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:52 AM2017-10-28T01:52:57+5:302017-10-28T01:53:10+5:30

हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी काही राजकारणी आणि काही पोलीस अधिकाºयांसोबत अंडरवर्ल्डलाही हाताशी धरून होता, हे सर्वश्रुत आहे.

'Bahubali' escapes from Telgi trap | तेलगीच्या सापळ्यात अडकला ‘बाहुबली’

तेलगीच्या सापळ्यात अडकला ‘बाहुबली’

Next
ठळक मुद्देपोलीस बनले दबंग : महाराष्टÑासह आंध्रच्या राजकारणातही वादळ

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी काही राजकारणी आणि काही पोलीस अधिकाºयांसोबत अंडरवर्ल्डलाही हाताशी धरून होता, हे सर्वश्रुत आहे. मात्र, तो या मंडळींना (त्याला ब्लॅकमेल करू पाहणाºयांना) ‘ट्रॅप’ करीत होता, हे धक्कादायक वास्तव तेलगीला अटक केल्याच्या दोन वर्षांनंतर उघड झाले. त्यावेळी (१९९९ ते २००३ या कालावधीत) आंध्र प्रदेशात मोठा राजकीय प्रभाव असलेल्या एका डॉनला तेलगीने अशाच प्रकारे सापळा लावून अडकवले होते. महाराष्टÑ पोलिसांनी त्यावेळी केलेल्या नाट्यमय कारवाईमुळे महाराष्टÑच नव्हे तर आंध्रातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती.
बनावट मुद्रांक छापून खोºयाने नोटा ओढणाºया तेलगीला राजकीय आणि गुन्हेगारी जगतातून पाठबळ मिळत होते. परंतु त्याला काही जण ब्लॅकमेलही करीत होते. तेलगीला विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतल्यानंतर त्याने दडवून ठेवलेली संपत्ती अन् रोकड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ठिकठिकाणचे काही ‘भाई लोक‘ धावपळ करीत होते.
तर, एसआयटी देखील तेलगीच्या पापाची दडलेली पाळमुळं खणून काढण्याच्या कामी लागली होती. एसआयडीचे तपास अधिकारी (सेकंड आय. ओ.) पुरुषोत्तम चौधरी यांनी तेलगीची चौकशी करताना त्याला कडेकोट बंदोबस्तात त्याच्या मुंबईतील ताज हॉटेलच्या मागे असलेल्या आलिशान सदनिकेत नेले. तेथे झाडाझडती घेताना चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांना एक सीडी मिळाली. ती जप्त केल्यानंतर तपास अधिकाºयांनी त्यातील संभाषण ऐकले. तेलगीला हैदराबादमधील एक बाहुबली (गँगस्टर) वारंवार खंडणीसाठी धमकावत होता अन् रक्कम उकळत होता, अशा आशयाचे त्यात संभाषण होते. त्या बाहुबलीने तेलगीकडून प्रचंड मोठी रक्कम उकळली असल्याचे संभाषणातून पुढे आल्यामुळे एसआयटीने त्याच्या मुसक्या बांधण्याची तयारी केली.
हैदराबादेत दंग्याची भीती
त्याचा त्रास वाढल्यामुळेच तेलगीने त्याचे धमकीचे फोन टेप करून ठेवले होते. त्याचीच ती कॅसेट होती. तेलगीकडून खंडणी उकळणाºया आंध्रातील त्या डॉनचा गुन्हेगारी जगतासह राजकीय क्षेत्रातही प्रचंड दबदबा होता. त्यामुळे त्याला कधी अन् कशा पद्धतीने अटक करायची, असा एसआयटीच्या अधिकाºयांसमोरचा प्रश्न होता. त्याला अटक केल्यानंतर प्रचंड विरोध होणार, पोलिसांवर हल्ला होण्याचाही धोका होता. हे सर्व ध्यानात घेत अतिरिक्त पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस अधीक्षक छत्रपती वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम चौधरी आणि पथकाने बाहुबलीच्या अटकेसाठी अ‍ॅक्शन प्लान तयार केला. त्यानुसार, चौधरी यांच्या नेतृत्वात पाच जणांचे पथक हैदराबादला पोहचले. तेथील तत्कालीन पोलीस महासंचालकांना (डीजी) तपास पथकाने आपल्या हैदराबाद दौºयाचे कारण सांगितले तेव्हा डीजीदेखिल स्तंभित झाले. मात्र, त्यांनी गोपनीयता बाळगण्याचा सल्ला देऊन काही दिवस वाट पाहा, असे म्हटले. बाहुबलीला अटक केल्यानंतर हैदराबादेत दंगे होऊ शकतात, हे ध्यानात घेत डीजींच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकारी चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांनी तब्बल चार दिवस बाहुबलीच्या दिनचर्येचा अभ्यास केला. पाचव्या दिवशी भल्यासकाळी बाहुबली मॉर्निंग वॉकला निघाला असता त्याच्यावर झडप घालून त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. एसआयटीच्या पथकाने त्याला आपल्या वाहनात कोंबले आणि पुण्यात आणले.
कोण होता बाहुबली?
कृष्णा यादव असे त्या बाहुबलीचे नाव होते. मोठी फौज पाठीशी असलेला यादव हा माजी आमदार होता. त्याच्या अटकेचे वृत्त कळताच त्यावेळी आंध्र प्रदेशसोबत महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रचंड खळबळ उडाली होती. हैदराबादमध्ये दंगे होण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला त्यामुळे फारसे काही विपरीत घडले नाही. मात्र, महाराष्ट्र पोलिसांवर अपहरणाचा आरोप लावण्यात आला होता. वरिष्ठ पातळीवरून सर्व प्रकारची कायदेशिर प्रक्रिया आधीच पूर्ण करून घेण्यात आल्यामुळे तो आरोप अन् बाहुबली यादवची पाठराखण करणारांचा विरोध गळून पडला. दरम्यान, ती कॅसेट चौकशीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली. त्यातील आवाज तेलगी अन् यादवचाच असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर यादव तब्बल तीन वर्षे पुण्याच्या कारागृहात बंदिस्त होता. त्याला अटक केल्यानंतर तेलगीने तपास अधिकाºयांकडे एक बडा मासा तुम्हाला पकडून दिला असे म्हटले होते.

Web Title: 'Bahubali' escapes from Telgi trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.