बाबा एकदा डोळे उघडा...म्हणत मुलाने फोडला टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:54 PM2018-08-17T23:54:36+5:302018-08-17T23:56:17+5:30

मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात येताच मुलगा भूपेशने एकच टाहो फोडला. ‘बाबा एकदा डोळे उघडा...’ असे म्हणून वडिलांच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. ही दु:खद घटना समरसता एक्स्प्रेसमध्ये सकाळी १०.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.

Baba once opened his eyes ... saying that he broke cry | बाबा एकदा डोळे उघडा...म्हणत मुलाने फोडला टाहो

बाबा एकदा डोळे उघडा...म्हणत मुलाने फोडला टाहो

Next
ठळक मुद्देप्रवासात वडिलांचा मृत्यू : समरसता एक्स्प्रेसमधील प्रसंग


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईवरून उपचार घेतल्यानंतर घरी परतत असताना बर्थवर झोपलेल्या वडिलांनी बराच वेळापासून हालचाल केली नाही. सकाळ झाल्यामुळे मुलगा भूपेशने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचे लक्षात येताच मुलगा भूपेशने एकच टाहो फोडला. ‘बाबा एकदा डोळे उघडा...’ असे म्हणून वडिलांच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. ही दु:खद घटना समरसता एक्स्प्रेसमध्ये सकाळी १०.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
मधुसूदन पाल (६६) रा. नडिया, हावडा असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते आजारी होते. उपचारासाठी पत्नी आणि मुलासोबत ते मुंबईला गेले होते. उपचार घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. मुंबई-हावडा समरसता एक्स्प्रेसच्या एस-३, बर्थ, २०, २२ वरून ते कुटुंबासह प्रवास करीत होते. सकाळ होऊनही ते बर्थवरून उठले नाहीत. नागपूर रेल्वेस्थानक येत असल्यामुळे बहुतांश प्रवासी बर्थवरून उठलेले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा भूपेशने आपल्या वडिलांना झोपेतून जागे होण्यासाठी आवाज दिला. त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भूपेशने वडिलांना हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीसुद्धा ते बर्थवरच निपचित पडले होते. ते कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून मुलगा भूपेश आणि त्याच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली. सकाळी १०.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर गाडी थांबताच उपस्टेशन व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार रेल्वेचे डॉक्टर समरसता एक्स्प्रेसवर हजर झाले. त्यांनी मधुसूदन पाल यांना तपासून मृत घोषित केले. हे ऐकताच मुलगा भूपेशने एकच टाहो फोडला. बाबा एकदा उठा...डोळे उघडा असे म्हणून त्याने वडिलांच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. ड्युटीवर उपस्थित हेड कॉन्स्टेबल अनिल कुवर यांनी मृतदेह गाडीखाली उतरवून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आला.

Web Title: Baba once opened his eyes ... saying that he broke cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.